महानगरपालिका आणि जिल्हापरिषद निवडणुकींच वाजलं बिगुल । निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

news-marathi-maharashtra-election-commision

मुंबई (११ जानेवारी २०१७): महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी आज पत्रकार परिषद घेतली. महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. राज्यात होणाऱ्या १० महानगरपालिका आणि २५ जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखांची आज घोषणा झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.

election-zp-panchayt-samiti-morba-kharvli
खालील दहा महापालिकांची निवडणूक २१ फेब्रुवारीला तर निकाल २३ फेब्रुवारीला आहेत.

१. मुंबई
२. पुणे
३. पिंपरी चिंचवड
४. ठाणे
५. उल्हासनगर
६. नाशिक
७. नागपूर
८. अकोला
९. अमरावती
१०. सोलापूर

खालील २५ जिल्हा परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून निवडणूक २ टप्यात होणार आहे. १६ फेब्रुवारी २०१७ आणि २१ फेब्रुवारीला मतदान आहे तर मतमोजणी – २३ फेब्रुवारी रोजी आहे.

१. रायगड
२. रत्नागिरी
३. सिंधुदुर्ग
४. पुणे
५. सातारा
६. सांगली
७. सोलापूर
८. कोल्हापूर
९. नाशिक
१०. जळगाव
११. अहमदनगर
१२. अमरावती
१३. बुलढाणा
१४. यवतमाळ
१५. औरंगाबाद
१६. जालना
१७. परभणी
१८. हिंगोली
१९. बीड
२०. नांदेड
२१. उस्मानाबाद
२२. लातूर
२३. वर्धा
२४. चंद्रपूर
२५. गडचिरोली

जिल्हा परिषद निवडणूका पहिला टप्पा – १६ फेब्रुवारी २०१७

औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, जळगाव, अहमदनगर, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली

जिल्हा परिषद निवडणूका दुसरा टप्पा – २१ फेब्रुवारी २०१७

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, गडचिरोली

निवडणुकांचे बिगुल वाजलं असलं, तरी शिवसेना, भाजप, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी यांच्यात युती-आघाडी होण्याबाबत कुठलाही ठोस निर्णय अद्याप झालेला नाही. रायगड जिल्हा परिषदेची निवडणूक २१ फेब्रुवारीला आहे तर निकाल २३ फेब्रुवारीला आहेत. २५ जिल्हा परिषदेचं मतदान २ टप्प्यात होणार आहे. १० महापालिका निवडणुका एका टप्प्यात होणार आहेत. १५ जिल्हा १६५ पंचायत समिती – १६ फेब्रुवारी मतदान आणि १० जिल्हा, ११८ पंचायत समिती – २१ फेब्रुवारी मतदान आहे. १० महापालिका निवडणूक – २१ फेब्रुवारीला मतदान आहे तर मतमोजणी – २३ फेब्रुवारी रोजी आहे. आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *