अजय देवगनचा पहिला मराठी चित्रपट ‘आपला मानूस’चा टीझर लाँच मुख्य भूमिकेत नाना पाटेकर

Aapla Manus New Marathi Movie Nana Patekar

बॉलिवूड सुपरस्टार अभिनेता अजय देवगनचा पहिलाच मराठी चित्रपट

मराठी फिल्म रसिकांसाठी २०१८ सुरुवात खास ठरली आहे. बॉलिवूड सुपरस्टार अभिनेता अजय देवगनची निर्मिती असलेला पहिला मराठी चित्रपट ‘आपला मानूस’चा टीझर रीलिज झाला आहे. ‘आपला मानूस’ चित्रपटात सगळ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते नाना पाटेकर या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

‘आपला मानूस’ सिनेमा ९ फेब्रुवारी २०१८ रिलीझ

Aapla Manus Marathi Movie Ajay Devgan

‘आपला मानूस’ सिनेमाचे दिग्दर्शक सतिश राजवाडे आहेत आणि सिनेमाचे निर्माते अजय देवगन आहेत. या सिनेमात नाना पाटेकर, इरावती हर्षे आणि सुमित राघवन प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ‘आपला मानूस’ सिनेमा ९ फेब्रुवारी २०१८ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात नाना पाटेकर क्राईम ब्रँचमधील वरिष्ठ पोलिस निरीक्षक मारुती नागरगोजे ही व्यक्तिरेखा साकारनार आहेत. ‘आपल्याला जमेल तेवढाच चांगुलपणा दाखवावा, आपण काय गांधी नाही’ या डायलॉगने आता या सिनेमाची उत्सुकता वाढवली आहे. नक्कीच हा सिनेमा मराठी बॉक्स ऑफिस वर रेकॉर्ड करताना आपल्याला दिसेल.

पहा ‘आपला मानूस’ सिनेमाचा टीझर:

नवीन बातम्यांसाठी पाहत राहा न्युज मराठी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *