Ultimate magazine theme for WordPress.

सविस्तर वृत्त- दापोली कोकण कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांची अखेरची ठरलेली पिकनिक, बस अपघात, ३३ ठार

0 722

रायगड-पोलादपूर ( योगेश भामरे-२८ जुलै २०१८): महिन्याचा चौथा शनिवार आणि रविवार सलग दोन दिवस सुट्टी असल्याने पिकनिक काढून धमाल करण्यासाठी दापोली कोकण कृषी विद्यापीठातील कर्मचारी निघाले होते. पण हि पिकनिक अखेरची ठरेल असे कोणालाही वाटले नव्हतं. दापोलीहून पिकनिकला महाबळेश्वर येथे जात असताना विद्यापीठातील बस भाड्याने करण्यात आली होती. रायगड पोलादपूरजवळ आंबेनळी घाटात ८०० फूट दरीत बस कोसळली. बसचा अक्षरशः चुरा झाला असून बस मधील मृतांची छिन्न विछिन्न अवस्था झाली आहे. यावेळी बसमध्ये ड्रायवर सह ३४ जण होती. यातील ३३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

दैवतारी त्याला कोण मारी?

एवढ्या भयंकर अपघातातून ८०० फूट दरीत बस कोसळून देखील एक व्यक्ती बचावला आहे. या दापोली कोकण कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्याचे प्रकाश सावंत देसाई असे नाव आहे. त्याने या दरीतून वरती चढत रोड वरती येत मोबाइलला रेंजमध्ये आल्यानंतर कृषी विद्यापीठात फोन करून झालेल्या अपघाताची माहिती दिली.

रेस्क्यू ऑप्रेशन अजूनही सुरूच

माहिती कळल्यानंतर कृषी विद्यापीठ प्रशासनाने त्वरित पोलिसांना कळवले आणि रेस्क्यू ऑप्रेशन सुरु झाले राहिलेल्या ३१ कर्मचारी आणि ड्रायवर यांना शोधण्यासाठी पण यातील १४ जणांनाच बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. आज रात्री उरलेल्या १८ जणांना काढण्यासाठी रेस्क्यू ऑप्रेशन सुरूच राहणार आहे.

अपघातातील मृत व्यक्तींची नावे – राजेंद्र बंडबे, हेमंत सुर्वे, सुनील कदम, रोषन तबीब, संदीप सुवरे, प्रमोद जाधव, विनायक सावंत, गोरक्षनाथ तोंडे, दत्ताराम धायगुडे, रत्नाकर पागडे, प्रमोद शिगवण, संतोष जालगावकर, शिवदास आगरे, सचिन गिम्हवणेकर, संजय सावंत, राजेंद्र रिसबुड, सुनिल साटले, रितेश जाधव, पंकज कदम, निलेश तांबे, संतोष झगडे, अनिल सावके, संदीप भोसले, विक्रांत शिंदे, सचिन गुजर, राजाराम गावडे, राजेश सावंत, सचिन झगडे, रवीकिरण साळवी, संजीव झगडे, सुशय बाळ

नवीन बातम्यांसाठी पाहत राहा न्युज मराठी.

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.