“आदर्श समता नगरचा राजा” गणेश मंडळाला भेटले २०१६ उत्कृष्ट देखाव्यासाठी प्रथम पारितोषिक

Shankar Sutar And Pratik More with DySP Mangaon

रायगड (माणगांव): सन २०१६ मध्ये दि. ०५/०९/२०१६ ते दि. १५/०९/२०१६ या कालावधीत साजरा करण्यात आलेल्या गणेशोत्सव सणामध्ये आदर्श समता नगर रहिवासी मंडळ युवा क्लब आयोजित गणेशोत्सवात सावित्री नदी येथील दुर्घटना दाखवण्यात आली होती आणि अपघात ग्रस्तांना श्रद्धांजली देण्यात आली होती. यांनी साकारलेल्या देखाव्याची आणि उपक्रमाची नोंद घेत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातर्फे माणगांव विभागातून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

img946-copy

आदर्श समता नगर युवा क्लब ठरलं माणगांव तालुक्यातील सर्वोत्कृष्ट गणेश मंडळ

दि. १२/१०/२०१६ रोजी सण २०१६ मधील माणगांव विभागातील सर्वोत्कृष्ट गणेश मंडळ म्हणून आदर्श समता नगर युवा क्लब यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक (प्रमाणपत्र) माणगांव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी (DySP) मा. दत्ता नलावडे साहेबांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले. हा कार्यक्रम उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय माणगांव येथे संपन्न झाला. ह्या वर्षी केलेल्या देखाव्याची प्रशंसा करत पुढील वर्षी अजून चांगलं काहीतरी मंडळाने करावं असंहि ते म्हणाले. तसेच मंडळामध्ये सगळे युवक दिसत आहेत त्यांनी सामाजिक कार्यात हि लक्ष्य देऊन एखादा उपक्रम राबवण्याचा सल्लाहि त्यांनी दिला.

उपविभागीय पोलीस अधिकारी (DySP) मा. दत्ता नलावडे साहेबांच्या हस्ते प्रमाणपत्र स्वीकारताना उत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री. शंकर सुतार

Pratik More

प्रथम क्रमांक भेटल्यानंतर हे यश तुम्हाला कसे वाटतेय असं विचारलं असता उत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री. शंकर सुतार यांनी संपूर्ण आदर्श समता नगर युवा क्लब यांनी चांगल्या प्रकारे केलेल्या कामातून आणि सेवेतून हे यश भेटले असल्याचं सांगितलं. या यशाचे श्रेय त्यांनी संपूर्ण आदर्श समता नगर युवा क्लबला दिले. अशीच बाप्पाची सेवा या पुढेहि ते चांगल्या पद्धतीने करत राहतील असंहि ते म्हणाले.

आदर्श समता नगरचा राजा २०१६

adarsh-samata-nagarcha-raja-2016

रायगड मधील या गणेश मंडळाची स्थापना २०१२ ला झाली असून या मंडळाचे आकर्षण असते तेथील देखावा. रायगड मधील माणगांव मधील या मंडळाने सतत ४ वर्ष विविध विषयांवर देखावे तयार केले आहेत.

20160908_155215

यावर्षी देखाव्यामध्ये सावित्री नदी पूल दुर्घटना दाखवून दुर्घटनाग्रस्त लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *