Ultimate magazine theme for WordPress.

राष्ट्रवादिकडुन अनिकेत तटकरे यांना कोकण विधानपरिषद निवडणुकीची उमेदवारी | गुरुवारी अर्ज दाखल करणार

अनिकेत तटकरेंना शेकापचा पाठींबा

0 1,040

रायगड (२ मे २०१८): कोकण स्वराज्य मतदार संघातुन या आधीच शिवसेनेने आपली उमेदवारी राजीव साबळे यांना दिली आहे. त्यांनी बुधवार दि. २ मे ला उमेदवारी अर्ज देखील भरला आहे. त्याच बरोबर भाजपने कोकणात माघार घेत राणेंच्या स्वाभिमान पक्षाला ही जागा दिली आहे. परंतु राष्ट्रवादीकडुन उमेदवार कोण ? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. वेगवेगळ्या नावांची चर्चा पाहायला मिळत होती. पण शिक्का मोर्तब काही झाले नव्हते. मात्र आता राष्ट्रवादी पक्षाने आपला उमेदवार जाहीर केला आहे. राष्ट्रवादीला कोकणात शेकापचा पाठींबा आहे.

कोकणातुन अनिकेत तटकरे लढवणार निवडणुक

याआधी राष्ट्रवादीकडुन आ. सुनिल तटकरे यांचे भाऊ अनिल तटकरे या मतदार संघातुन आमदार होते. त्यांचा कार्यकाळ संपल्यावर पुन्हा त्यांनाच उमेदवारी मिळनार असे सगळ्यांना वाटत होते. परंतु यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटनीस आ. सुनिल तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या उमेदवारीमुळे तरुण कार्यकर्ते खुश आहेत. याआधी जरी अनिकेत तटकरे यांनी निवडणुक लढविली नसली तरी त्यांच्याकडे जिल्हा परिषद व स्थानिक पातळीवरिल निवडणुकिंचा अनुभव आहे. राजकारणात सक्रीय असल्यामुळे ते राजकीय पेच डावपेच जाणतात.

अनिकेत तटकरे ३ मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार

गुरुवार दि. ३ मे २०१८ ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारिख आहे. त्यामुळे गुरुवारी अनिकेत तटकरे उमेदवारी अर्ज दाखल करणार हे निश्चित आहे. राष्ट्रवादी पक्षाकडुन तशा हालचाली देखील सुरु झाल्या आहेत.

नवीन बातम्यांसाठी पाहत राहा न्युज मराठी.

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.