Ultimate magazine theme for WordPress.

ऑस्ट्रेलियन संघ आज हरला तर सिरीज मधून बाहेर

0 44

१० जून २०१७: आज ऑस्ट्रेलियन संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये जिंकणं गरजेचं आहे. कारण बांगलादेशने ग्रुप ए मध्ये न्यूझीलंड संघाला हरवून अंक तालिकेत २ गुण मिळविले आहेत. बांगलादेशचा ऑस्ट्रेलिया बरोबर मॅच ड्रॉ चा आधीचा १ गुण मिळून बांगलादेश एकूण ३ गुणांसह दुसऱ्या क्रमांकाचा संघ झाला आहे. बांगलादेशने न्यूझीलंडला हरवून सेमी फायनलच्या रेसमध्ये आपले स्थान मजबूत केले आहे. ऑस्ट्रेलियाचे आधीचे दोनही सामने पावसामुळे ड्रॉ झाले त्यामुळे त्यांना दोनही सामन्याचा सामन्यात १-१ गुण देण्यात आला. ऑस्ट्रेलिया एकूण २ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडने झालेले दोनही सामने जिंकत ४ गुणांसह आपले स्थान सेमीफायनलसाठी निश्चित केले आहे. ऑस्ट्रेलियाला जर आता सेमीफायनलमध्ये जायचं असेल तर इंग्लंडला हरवणं भागच आहे. त्यामुळे आजचा इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया सामना अटीतटीचा असणार आहे.

ग्रुप ए मध्ये इंग्लंड सेमीफायनलमध्ये गेली आहे आणि आज ऑस्ट्रेलिया हरलीतर बांगलादेश सेमीफायनल खेळणार असे स्पष्ट आहे. दुसरीकडे ग्रुप बी मध्ये चारही संघ १ सामना जिंकून व १ सामना गमावून अंकतालिकेत समान २ गुण मिळवून आहेत. नेट रनरेटच्या आधारे भारत, साऊथ आफ्रिका, श्रीलंका, पाकिस्तान या क्रमाने संघ असणार आहेत. ग्रुप बी मध्ये कोणता संघ सेमीफायनलला जाणार हे अजून स्पष्ट नाही. भारत वि. साऊथ आफ्रिका आणि श्रीलंका वि. पाकिस्तान या सामन्यांत जो संघ विजयी होईल त्या संघाला सेमीफायनलमध्ये स्थान मिळेल.

नवीन बातम्यांसाठी पाहत राहा न्युज मराठी.

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.