Ultimate magazine theme for WordPress.

बसमधील किरकोळ वाद ठरला अपघाताला कारण

कोणीही जखमी नाही, प्रवाशांचे मात्र हाल

0 627

माणगांव (२८ मे २०१८): माणगांव अशोकदादा साबळे विद्यालयासमोर वाहनाच्या रेल्वेच्या पुलाआधी उंचीची सीमा दर्शवण्यासाठी असणा-या लोखंडी पोलाला भरधाव वेगात येणा-या बसचे वरील कैरीअर लागल्यामुळ रेल्वे विभागाकडुन उंचीसाठी लावण्यात आलेले हे पोल पुर्णपने वाकुन एका बाजुने तुटुन रोडवर येऊन पडले. सुदैवाने रोडवर वाहने नसल्यामुळे मोठा अपघात टळला. अपघातात कोणीही जखमी झाले नाही.

सविस्तर व्रुत्त असे की, एम.एच १४ बीटी १७२३ ही बस बोरीवलीहुन रात्री १२.०३ मि. कणकवली येथे जात असताना. माणगांव येथे बस कंडक्टर आणि प्रवासी यांच्यात झालेल्या किरकोळ वादावरुन प्रवाश्याच्या हट्टापायी बस ड्रायवरने गाडी माणगांव पोलिस ठाण्याकडे वळविली असता साबळे विद्यालयाजवळील रेल्वे पुला आधी उंची सुचक असणा-या लोखंडी पाईपला बसचे वरील कैरीअर लागले. बस वेगात असल्यामुळे आणि पोल काळ्या आणि सफेद रंगाचे असल्यामुळे ड्राईव्हरला उंची लक्षात आली नाही. रोडवरती ईतर वाहणे असती तर मोठा अपघात होऊ शकत होता. गाडी तेथेच ठेवुन ड्रायवर कंडक्टर आणि वाद घालणारा प्रवासी पोलिस ठाण्यात गेले. मात्र या अपघातामुळे बाकी प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.

नवीन बातम्यांसाठी पाहत राहा न्युज मराठी.

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.