राजकीय पक्षांच्या खात्यात भरू शकतात कितीही पैसे । तरी टॅक्स शून्यच

tax-free-politics

पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर संपूर्ण देशात एकच कल्लोळ उडाला तो म्हणजे सर्वसामान्य माणसांनी बँकेत जाऊन जुन्या नोटा जमा करायचा. त्यावरही सरकारने अडीच लाखाच्या वरती पैसे जमा करणाऱ्यांना चौकशी होऊ शकते असे बजावले होते. या निर्णयामुळे मोठ्याप्रमाणात काळ धन बाहेर पडेल आणि टॅक्स घेता येईल अशी सरकारची चांगली भूमिका लक्षात घेऊन सर्वसामान्य जनतेने अगदी पैश्यांचा घरात तुटवडा असताना सुद्धा सरकारला पाठिंबा दिला. जनतेच्या पैश्यांवरती टॅक्स आणि पेनल्टी जर हिशोब देता नाही आला तर आकारण्यात येत आहे. सर्वसामान्य लोकांच्या खात्यामध्ये जमा होणाऱ्या पैशानं वरती सरकारची नजर आहे. पण दुसरीकडे राजकीय पक्षांना सरकारने सूट दिली आहे. कारण राजकीय पक्षांच्या खात्यात जमा होणाऱ्या पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटांवर कोणताही टॅक्स लागणार नाही आहे.

1000-rs-notes

नोटबंदीबाबत राजकीय पक्षांना सरकारने दिली आहे सूट

राजकीय पक्षांना पहिल्यापासूनच आयकर कायद्यातून सूट असल्यामुळे त्यांनी खात्यात कितीही नोटा जमा केल्या तरी त्यांना कोणताही कर आकारला जाणार नाही.

सर्वसामान्य जनतेच्या अतिरिक्त पैश्यांना मोठा दंड आणि कर घेतला जाणार आणि राजकीय पक्षांची विचारणा सुद्धा होणार नसल्याने आता सरकारवर टीका होण्यास सुरवात झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *