Ultimate magazine theme for WordPress.

डॉ. अजय मोरेंच्या प्रयत्नांना यश माणगांवमध्ये नाट्यगृहाला हिरवा कंदील

0 540

रायगड(माणगांव): माणगांव येथे बंधिस्त नाट्यगृह व्हावे यासाठी गेली अनेक वर्ष प्रयत्न चालू होते. रायगडमध्ये माणगांव मध्यवर्ती ठिकाण मानले जाते. मुंबई-पुणे शहरापासून काही तासांच्या अंतरावर असलेले माणगांव शहराला सांस्कृतिक कला गुणांना वाव देण्यासाठी हक्काच माणगांवच नाट्यगृह पाहिजे अशी खरतर माणगांवकरांची इच्छा आहे. माणगांव येथील अष्टविनायक कला अकादमी माणगांव या सांस्कृतिक संस्थे मार्फत माणगांवमध्ये गेली अनेक वर्ष नवनवीन उपक्रम प्रामाणिकपणे व जीव ओतून काम करून राबविले जात आहेत. रायगडमधील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे व त्यांचा विकास व्हावा यासाठी गेली सलग १० वर्ष अभिनय कार्यशाळा व शॉर्ट फिल्म मेकींग वर्कशॉप घेतले जातात तसेच ‘धुमाकूळ मनोरंजनाचा ‘ व ‘गौरव मराठी कलेचा ’ या दोन ओर्केस्टा सोबतच ‘जय हो !’ या धमाल विनोदी नाटकाचे रायगड व रायगडच्या बाहेर १५० हूनजास्त विक्रमी प्रयोग या संस्थेने पूर्ण केले. गेल्या तीन – चार वर्षात माणगांव येथे मोठ-मोठे कार्यक्रम संस्था यशस्वी राबवीत आहे, यामध्ये जेष्ठ समाजसेविका ‘रेणुताई गावस्कर’ यांचा ‘मालक नका पालक व्हा!’ व थोर समाजसेविका ‘डॉ.सिंधूमाई सपकाळ’ यांचा स्त्रियांना स्फूर्ती देणारा एक आगळा व वेगळा कार्यक्रम व ‘सावित्रीबाई फुले स्त्रीशक्ती पुरस्कार -२०१७’ सोहळा या संस्थेने यशस्वी राबविले आहेत. रायगड जिल्हातील विद्यार्थांसाठी प्रोत्साहन देणारे व शिक्षकांसाठी पुरस्कारचे असे अनेक सामाजिक उपक्रम या संस्थेने राबविले आहेत. माणगांव येथे अशा प्रकारे सांस्कृतिक कार्यक्रम राबविताना अनेक अडचणींवर मात करावी लागते. हीच बाब लक्षात घेऊन सांस्कृतिक कलागुणांना माणगांवमध्ये वाव भेटण्यासाठी डॉ. अजय मोरे यांनी नाटयगृहासाठी आपल्यापरीने प्रयत्न करायला सुरवात केली.

विशेष बाब म्हणून माणगांवमध्ये नाट्यगृहासाठी सुमारे २ एकरच्या सरकारी जागेवर अंदाजे ४ करोड रुपयाची मंजुरी

Dr. Ajay More Mangaon Natyagruh

माणगांव येथील सांस्कृतिक कार्यकर्ते व अष्टविनायक कला अकादमी माणगांव या संस्थेचे अध्यक्ष डॉ.अजय आत्माराम मोरे यांनी नाट्यगृहाचा प्रस्ताव व्हाट्सअँप, फेसबुक व वर्तमान पत्राच्या माध्यमातून जोरदार उचलून धरला. खुद्द मुख्यमंत्री व सांस्कृतिक मंत्री यांना वारंवार पत्राद्वारे व सांस्कृतिक मंत्री यांना प्रत्यक्ष भेटून याचा पाठपुरावा घेतला. माणगांव येथे मोठ्या प्रमाणावर सांस्कृतिक कार्यक्रम राबविताना त्यांना अनेक अडचणींवर मात करावी लागते. माणगांव येथे बंधिस्त नाट्यगृह झाल्यास आमच्या नाट्य चळवळीला प्रोत्साहन,कलाकारंचा विकास व नाट्यरसिकांना सोयीस्कर होईल हे वारंवार पत्राद्वारे त्यांनी कळवले. शेवटी प्रयत्नांना यश आले याची दखल मुखमंत्री व सांस्कृतिक मंत्री यांनी घेऊन विशेष बाब म्हणून घेतली. माणगांवचे नगराध्यक्ष व रायगड जिल्हा अधिकारी यांच्या सहकार्याने नाट्यगृहाला मंजुरी मिळाली असून माणगांव येथे लवकरच नाट्यगृह होणार आहे. सुमारे २ एकरच्या सरकारी जागेवर अंदाजे ४ करोड रुपयाची मंजुरी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभाकडून मान्यता देण्यात आलेली आहे.

नाट्य चळवळ सुरु राहावी या प्रामाणिक हेतूने ‘नाट्यरसिक सभासद योजना २०१७’

News Ajay More Raigad

 रायगड करंडक-२०१६ राज्यस्तरीय मराठी एकांकिका या भव्य दिव्य स्पर्धेनंतर माणगांवमध्ये नाट्य चळवळ सुरु राहावी या प्रामाणिक हेतूने ‘नाट्यरसिक सभासद योजना २०१७’ सुरु केली यामध्ये सुभारांभाचा प्रयोग १)‘सौजन्याची ऐशीतैशी’ (भरत जाधव),२)‘अतिथी देवो भव’ (राजन भिसे), ३)‘शांतेच कार्ट चालू आहे’ (भाऊ कदम), ४) ‘नजराणा हास्याचा’(स्मिता ओक) व शेवटच तुफान धमाल विनोदी नाटक ५) ‘गेला उडत’(सिद्धार्ध जाधव) असे दर्जेदार कार्यक्रम या संस्थेमार्फत यशस्वीरीत्या राबविले जात आहेत. या संस्थे मार्फत पुढील वर्षी ‘रायगड सांस्कृतिक महोत्सव -२०१८’ चे आयोजन होणार असून यामध्ये ‘एकपात्री अभिनय’,एकांकिका व शॉर्ट फिल्म महोत्सव सादर होणार आहे. महाराष्ट्रातील दर्जेदार निवडक कार्यक्रम दाखविले जाणार आहेत. सांस्कृतिक मंत्री,अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे व नाट्य परिषदचे अध्यक्ष, एक मोठी सेलिब्रेटी, ०७ देशातील व ०५ राज्यातील प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार असून याची दखल खुद्द मुख्यमंत्री व सांस्कृतिक मंत्री यांनी घेतली आहे. याची पोहच पावती म्हणजे ‘अष्टविनायक कला अकादमी,माणगांव’ या सांस्कृतिक चळवळ जतण करणाऱ्या संस्थेला बंधीस्त नाट्यगृह प्रस्तावासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला गेला.

अष्टविनायक कला अकादमी माणगांव या सांस्कृतिक संस्थेचे अध्यक्ष डॉ.अजय आत्माराम मोरे यांच्या प्रामाणिक धडपडीला व प्रयत्नांना यश आले असून त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक व शुभेच्छा दिल्या जात आहेत.

नवीन बातम्यांसाठी पाहत राहा न्युज मराठी.

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.