Ultimate magazine theme for WordPress.

तळा तालुका १६ वे विज्ञान प्रदर्शन उद्धघाटन रा.जि.प. अध्यक्षा आदितीताई तटकरे यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थिती तळा प.स. सभापती रविंद्र नटे

0 1,042

तळा: तळा तालुका १६ वे विज्ञान प्रदर्शनाचे उद्धघाटन दिमाखात करण्यात आले. तळा तालुका पंचायत समिती, शिक्षण विभाग व पढवण वाली पंचकृषी शिक्षण प्रसारक मंडळाचे माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने या कार्यक्रमाचे उद्धघाटन रा.जि.प अध्यक्षा आदितीताई तटकरे आणि तळा पं.स. सभापती रवींद्र नटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

Excavation at Tala Taluka 16th science exhibition Ravindra Nate

आदितीताई तटकरे आणि रवींद्र नटे यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी रा.जि.प. अध्यक्षा आदितीताई तटकरे, तळा पं. स. सभापती रविंद्र नटे आणि तळा पं. स. माजी सभापती नाना भौड यांनी आपले मनोगत व्यक्त केले व मार्गदर्शन केले.

या विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक विभागाच्या २९ प्रतिकृती, माध्यमिक विभागाच्या १० प्रतिकृती, शैक्षणिक साहित्य माध्यमिक विभाग ८ प्रतिकृती व लोकसंख्या शिक्षण ४ प्रतिकृती मांडण्यात आल्या होत्या.

Excavation at Tala Taluka 16th science exhibition News

तसेच या कार्यक्रमास तळा पं. स. उपसभापती, गणेश वाघमारे, रा.जि.प सदस्य बबन चाचले, पं. स. सदस्या सौ. अक्षरा कदम, देविका लासे, नगरसेवक चंद्रकांत रोडे, माजी सभापती नाना भौड, पढवण सरपंच अजय जाडे, किशोर शिंदे, अड. उत्तम जाधव, काकडशेत उपसरपंच शरद सारंगे, पं स. गटविकास अधिकारी व्ही. व्ही. यादव, प्रभारी गट शिक्षण अधिकारी सहदेव सोंडकर, विस्तार अधिकारी सुरेखा तांबट, प्रविण अंबारले, देवीदास रामाणे, निलेश कदम, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख तसेच शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवीन बातम्यांसाठी पाहत राहा न्युज मराठी.

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.