ज्या गुरुजनांनी मला घडविले त्यांचा सत्कार करताना अभिमान वाटतो – जन सामान्यांचे नेते तळा पंचायत समिती सभापती रवींद्र नटे
तळा: आपल्या देशाचे भविष्य हे येणारे विद्यार्थीच घडवनार आहेत. त्यांना घडविण्याचे काम शिक्षक वर्ग प्रामाणिकपणाने करतो म्हणुन अशा शिक्षकांवर कौतुकाची थाप हि पडलीच पाहीजे जेणे करुन ते अधिक उत्साहाने काम करतील ही गोष्ट लक्षात घेऊन लोकनेते तळा पं. स. सभापती रवींद्र नटे यांनी पंचायत समितीच्यावतीने रा. जि. प. आदर्श शिक्षक पुरस्कार ज्यांना मिळाला अशा पंचायत समितीच्या वतीने सत्कार केला तसेच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा देखील सत्कार करण्यात आला. तसेच तळा तालुक्यात जे शिक्षक प्रामाणिकपणे काम करत आहेत अशा १४ शिक्षकांच्या देखिल सत्कार करण्यात आला. ज्यांनी जिल्ह्यामध्ये खेळात प्राविण्य मिळविले अशा खेळाडुंना देखील सभापती रविंद्र नटे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना रवींद्र नटे यांनी ज्यांनी मला घडविले त्या गुरुजनांचा सत्कार करताना मनापासुन आनंद होत असल्याचे सांगितले. तसेच ना. सुनिल तटकरे यांचे देखील तोंडभरुन कौतुक केले.
सत्कार करण्यात आलेल्या आदर्श शिक्षक
१. नामदेव तांबडे
२. अंजली धारसे
३. किर्ती भाटकर
सत्कार करण्यात आलेल्या आदर्श अंगणवाडी मदतनीस
१. हर्षदा महाडीक
२. ऋतिका घाटवळ
गौरविण्यात आलेल्या खेळाडुंची नावे
१. हिंदवी शिंदे – कुस्तीत प्रथम क्रमांक
२. साक्षी चोरगे – ३ कि.मी धावणे -तृतीय क्रमांक
गौरविण्यात आलेल्यांची नावे
१. राजेंद्र पाटील
२. किशोर पाडगे
३. कमलाकर चोरगे
४. मित्तल वावेकर
५. गौतम मनवर
६. सुजाता म्हात्रे
७. रत्नाकर पाटील
८. विवेकानंद पोटे
९. मोहन जाधव
१०. विजय पवार
११. कल्याणी वाजे
१२. गिरीधर गावीत
१३. शिवदास काटकर
१४. आयाजी जमदाडे
१५. जगदीश कासे
१६. भारती पाटोळे
१७. आदम मिर्झा
१८. रविंद्र म्हात्रे
यावेळी पंचायत समिती सदस्या देविका लासे, पंचायत समिती गटविकास अधिकारी व्ही.व्ही. यादव, प्रभारी गटशिक्षण अधिकारी सहदेव सोंडकर विस्तार अधिकारी सुरेखा तांबट, नगरसेवक चंद्रकांत रोडे, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष नागेश लोखंडे, शाळांचे मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.