भारतीय जवानांचा नियंत्रण रेषा [LoC] पार करून २० अतिरेक्यांचा खात्मा

indian-army-uri

“The Quint” वेब साईटचा दावा भारतीय सैन्याच्या २ तुकड्यांनी पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये हेलिकॉप्टरने जाऊन २० दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचे वृत्त प्रकाशित केले आहे. 

Print

पाकव्याप्त काश्मीरमध्ये हेलिकॉप्टरने जाऊन २० अतिरेक्यांचा खात्मा

सविस्तर वृत्त: उरी मध्ये रविवारी १८ सप्टेंबर २०१६ ला भारतीय लष्कराच्या मुख्यालयावर झालेल्या अतिरेकी हल्या मध्ये भारताचे १८ जवान शहीद झाले. भारतावर झालेल्या या हल्ल्यानंतर सरकार काय पाऊल उचलते ह्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष्य लागून आहे. या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंह, सुरक्षामंत्री मनोहर पार्रिकर, विदेशमंत्री सुषमा स्वराज, वित्त मंत्री अरुण जेटली व इतर मंत्र्यांच्या बैठका चर्च्या सुरु आहेत. भारतीय जनतेकडून पाकिस्तानवर सरकारने कारवाई करावी अशी मागणी असताना असे वृत्त मिळत आहे कि भारतीय जवानांच्या २ तुकड्यांनी दिनांक २० सप्टेंबर २०१६ ला नियंत्रण रेषा [LoC] पार करून २० अतिरेक्यांना शोधून त्यांच्या खात्मा केला. नियंत्रण रेषा [LoC] पार करण्यासाठी भारतीय जवानांच्या या २ तुकड्यांनी हेलिकॉप्टरचा वापर केला. या जवानांच्या तुकड्यांमध्ये १८ ते २० जवान होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *