एक वर्षाची झाली माणगांव नगर पंचायत पण बाळसं घेईना

problems-in-mangaon

माणगांव: माणगांवमधील ग्रामपंचायतीची एक वर्ष आधी नगर पंचायत झाली. नगर पंचायत झाली असल्यामुळे माणगांवकरांना वाटलं माणगांवच्या विकासाला आता गती येईल. परंतु असे काहीही झालेले नसून ज्या प्राथमिक समस्या माणगांवमध्ये होत्या त्या तशाच राहिल्या आहेत. त्याकडे नगर पंचायत लक्ष घालत असल्याचं सध्या तरी दिसून आलेलं नाही.

mangaon-nagar-panchayt

काय आहेत मुख्य प्रश्न?

  • माणगांवमध्ये प्रमुख रस्ता मानला जाणाऱ्या कचेरी रोडची दुरावस्था जशी आधी होती तशीच आत्ता कायम आहे. तसेच अंतर्गत रस्त्यांची कामही करण्यात आलेली नाहीत.
  • माणगांवमध्ये पाण्याची अनियमितता दुसरी समस्या आहे. पाणी वेळेवर येत नाही आणि आले तरी कधी जास्त वेळ असत तर कधी अतिशय कमी वेळ त्यामुळे नागरिकांचे हाल होतात.
  • स्वछता नसणं हि तिसरी समस्या आहे. एकीकडे केंद्र सरकार स्वच्छ भारत मोहीम चालवत आहे आणि येथे कचरापेटीतील कचरा वेळेवर उचलायला नगर पंचायत टाळा-टाळ करत आहे. तर घंटा गाडीमध्ये कचरा टाका असे सांगून गाडीचं पाठवली जात नाही. जेव्हा तक्रार केली जाते तेव्हा कारण दिल जात, नाही तर दोन-तीन दिवस गाडी पाठवून पुन्हा गाडी यायची बंद होते. माणगांव नगर पंचायत, स्वच्छ माणगांव, सुंदर माणगांव फक्त आपल्याला नगर पंचायतमधील कचरापेटीकडे पाहिल्यावर बोलता येईल. ग्रामपंचायत कालखंडामध्ये अनधिकृत बांधकामांना दिलेल्या संमतीमुळे आज सांडपाण्याची समस्या निर्माण झाली आहे.

kacheri-road-mangaon

या प्राथमिक गरजा सुद्धा पूर्ण करण्यात नगर पंचायत अयशस्वी ठरली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीची नगर पंचायत झाली म्हणजे विकास काम होतील हा माणगांवकरांचा अंदाज चुकीचा ठरला आहे आणि माणगांव नगर पंचायत होऊन १ वर्ष उलटला पण विकास काहीच नाही त्यामुळे एकप्रकारचा नाराजीचा सूर नागरिकांमध्ये पाहायला भेटत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *