Ultimate magazine theme for WordPress.

कोकण विधानपरिषद: राजीव साबळें विरोधात तटकरे राणे एकत्र

शिवसेनेला निवडणुक कठीण जाणार

0 723

रायगड: कोकण विधानपरिषद निवडणुकीत अनिकेत तटकरेंची ताकद वाढलेली दिसत आहे. या आधीच राष्ट्रवादीला शेकाप, काँग्रेस, मनसे, रिपाई यांनी पाठींबा जाहीर केला आहे. मात्र आता कोकण विधानपरिषदेसाठी ज्या पक्षाचा पाठींबा महत्वाचा समजला जात होता त्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे यांना पाठींबा दिला आहे. थोड्याच वेळात नारायण राणे यांनी कोकणात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक बोलाविली आहे. या बैठकीनंतर थोड्याच वेळात अनिकेत तटकरेंना पाठींब्याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येऊ शकते.

भाजपाने महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने स्वत:चा उमेदवार उभा करावा असा प्रस्ताव दिला होता. राणेंनी स्वत:चा उमेदवार उभा न करता अनिकेत तटकरेंना राष्ट्रवादीला पाठींबा देण्याचे ठरविले आहे. या पाठींब्यामुळे कोकण विधानपरिषद निवडणुकीचे गणित पुर्णपने बदलताना दिसत आहे. राणे आणि तटकरे या कोकणातील दिग्गज नेत्यांच्या एकत्र येण्याने शिवसेनेला ही निवडणुक सोप्पी जाणार नाही हे निश्चित आहे.

रायगडच राजकारण राणेंच्या पाठींब्यावर ठरणार का?

कोकण विधानपरिषद निवडणुक शिवसेनेकडुन राजीव साबळे लढवत आहेत. रायगडमध्ये तटकरेंना स्वत:च वर्चस्व कायम ठेवायच असेल तर त्यांना साबळेंना कोणत्याही परिस्थितीत रोखणे गरजेचे मानले जात आहे. जर का राजीव साबळे हि निवडणुक जिंकले तर आपले पुढील राजकारण धोक्यात येईल हे जाणुन राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय सरचिटनिस आ. सुनिल तटकरे पुर्ण शक्तीने आपल्या मुलाला निवडुन आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. राणेंचा पाठींबा ह्याचाच एक भाग आहे. त्यामुळे रायगडच राजकारण राणेंच्या पाठींब्यावर ठरणार का? असाच प्रश्न रायगडमधील जनतेला पडला आहे.

राणे आणि तटकरे यांच्या एकत्र आल्याने राजीव साबळेंना निवडणुक अवघड जाणार हे निश्चित आहे.

नवीन बातम्यांसाठी पाहत राहा न्युज मराठी.

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.