Ultimate magazine theme for WordPress.

महाड: कोकण रिपब्लिकन सामाजिक संस्थाच्या वतीने गरीब व गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप

आर.बी. मोरे माध्यमिक विद्यालय दासगांव अशा विध्यार्थ्यांना वह्या व स्कूल बॅग व इतर शालेय वस्तूचे मोफत वाटप

0 730

(महाड-योगेश भामरे): कोकणस्थ जनतेच्या न्याय हक्कासाठी लडणारी कोकण रिपब्लिकन सामाजिक संस्था गेले ४ ते ५ वर्ष महाड शहरात कार्यरीत आहे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाशजी मोरे साहेब, ह्यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिका शाळा क्रमांक २ चे मुले संस्थेने दत्तक घेतलेली मुले आणि आर.बी. मोरे माध्यमिक विद्यालय दासगांव अशा विध्यार्थ्यांना वह्या व स्कूल बॅग व इतर शालेय वस्तूचे मोफत वाटप करण्यात आले.

हया कार्यक्रमाचे अवचित साधुन महाड तालुका नवीन कार्यकरणी स्थापन करण्यात आली, तसेच महाड तालूका अध्यक्षपदी भीमराव तांबे व केंद्रीय सदस्यपदी बाळकृष्ण साळवी ह्यांची नेमणूक कऱण्यात आली. संस्थापक अध्यक्ष प्रकाशजी मोरे साहेब ह्यानि आपले मनोगत व्यक्त करून पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच केंद्रीय कमिटी उपाध्यक्ष मा.संघराजजी तांबे, सचिव दिपकजी पवार, कार्याध्यक्ष मा. चंद्रकिरण सकपाळ, कोषाध्यक्ष मा.बबनभाई राजपकर, सहसचिव मा.अनिल जाधव, तसेच यावेळी कार्यक्रमाला उपस्थीत असलेले मान्यवर बहुजन समाज परिवर्तन सामाजिक संस्था चे अध्यक्ष अरुणा आजगावकर ,अमृता वाघमारे,सुवर्ण निकम, कमलेश शिंदे, दिपक महाडिक,मंगेश तांबे, कुणाल नितनवरे,राजेंद्र शेलार,रवींद्र शिर्के,विठ्ठल धोत्रे, निलेश लोखंडे, शिक्षक वर्ग ,आदी कार्यकर्ते उपस्थीत होते.

नवीन बातम्यांसाठी पाहत राहा न्युज मराठी.

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.