Ultimate magazine theme for WordPress.

माणगांवमध्ये कबड्डीच्या भव्य जिल्हास्तरीय स्पर्धेला सुरवात

0 1,778

रायगड (माणगांव- २८ जानेवारी २०१७): लोकनेते अशोकदादा साबळे स्मृती प्रतिष्ठान माणगांव आयोजित व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांचे मान्यतेने जिल्हास्तरीय खुल्या महिला व पुरुष कबड्डी स्पर्धेची आज सुरवात झाली आहे. आज महिला संघाचे सामने खेळवण्यात येणार असून उद्या दि. २९ जानेवारी २०१७ ला पुरुष गटाचे सामने खेळवण्यात येणार आहेत. शिवसेना माणगांव तालुका अध्यक्ष अनिल नवगणे यांच्या हस्ते प्रथम सामन्याचे नाणेफेक करून स्पर्धेला सुरवात करण्यात आली. यावेळी राजीवजी साबळे, मारुतीशेठ बोंबले उपस्थित होते.

Rajiv Sable 2017 Mangaon Kabaddi

लोकनेते अशोकदादा साबळे स्मृती प्रतिष्ठान माणगांव आयोजित कबड्डी स्पर्धेला प्रेक्षकांचा उत्तुंग प्रतिसाद

अशोकदादा साबळे विद्यालयाच्या पटांगणावर स्पर्धा खेळवली जात आहे. प्रेक्षकांना बसण्यासाठी उभारण्यात आलेल्या स्टँडसोबतच आजूबाजूचे पटांगण सुद्धा पूर्ण भरले आहे. या स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्यातील नावाजलेले कबड्डीचे संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धा रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या नियमाप्रमाणे खेळवल्या जात आहेत. सदर स्पर्धा मॅटवर खेळवल्या जात आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघाकडून कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारलं गेलेलं नाही आहे.

लोकनेते अशोकदादा साबळे स्मृती प्रतिष्ठान माणगांव आयोजित कबड्डी स्पर्धेबद्दल थोडक्यात माहिती

IMG-20170128-WA0043

महिला गट

प्रथम क्रमांक पारितोषिक : १५,५५५ रु/- व स्मृती चिन्ह
द्वितीय क्रमांक पारितोषिक : ११,१११ रु/- व स्मृती चिन्ह
तृतीय क्रमांक पारितोषिक : ५,५५५ रु/- व स्मृती चिन्ह
चतुर्थ क्रमांक पारितोषिक : ५,५५५ रु/- व स्मृती चिन्ह
सर्वोत्कृष्ट खेळाडू : २,१०० रु/- व स्मृती चिन्ह
सर्वोत्कृष्ट चढाई : १,१०० रु/- व स्मृती चिन्ह
सर्वोत्कृष्ट पकड : १,१०० रु/- व स्मृती चिन्ह

पुरुष गट

प्रथम क्रमांक पारितोषिक : ३३,३३३ रु/- व स्मृती चिन्ह
द्वितीय क्रमांक पारितोषिक : २२,२२२ रु/- व स्मृती चिन्ह
तृतीय क्रमांक पारितोषिक : ११,१११ रु/- व स्मृती चिन्ह
चतुर्थ क्रमांक पारितोषिक : ११,१११ रु/- व स्मृती चिन्ह
सर्वोत्कृष्ट खेळाडू : ३,१०० रु/- व स्मृती चिन्ह
सर्वोत्कृष्ट चढाई : २,१०० रु/- व स्मृती चिन्ह
सर्वोत्कृष्ट पकड : २,१०० रु/- व स्मृती चिन्ह

लोकनेते अशोकदादा साबळे स्मृती प्रतिष्ठान माणगांव आयोजित कबड्डी स्पर्धा पहा लाईव्ह टीव्हीवर

IMG-20170128-WA0044

या स्पर्धेसाठी माणगांवमधील नावाजलेला कबड्डीचा वाकडाई संघ सुद्धा सहभागी झाला आहे. त्यांचा खेळ पाहण्यासाठी माणगांवकर उत्सुक आहेत. या स्पर्धा आपण माणगांवमध्ये राजेश विचारे यांच्या श्री. केबल नेटवर्क च्या साहाय्याने घरात बसून लाईव्ह टीव्हीवर पाहू शकता.

नवीन बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.