Ultimate magazine theme for WordPress.

माणगांव नगरपंचायतीचे मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष, पण दारू विक्रीकडे भर

0 1,357

माणगांव (२२ एप्रिल २०१७): सर्वोच्य न्यायालयाने महामार्गावरील दारू विक्री करणाऱया दुकानांवरील बंदी कायम ठेवून त्यामध्ये हॉटेल – रेस्टॉरंट, बार आणि परमिट रूम यावरहि बंदी आणली आहे. हे स्पष्ट केलं आहे. या संदर्भात राज्य सरकार ची पळवाट सर्वोच्य न्यायालयाने फेटाळली.
सध्या दारूबंदीचा विषय चर्चेमध्ये असताना माणगांव नगरपंचायतचे नगराध्यक्ष आनंदशेठ यादव यांनी काही दारू विक्रेत्यांच्या भल्यासाठी माणगांव शहरातून जाणारा महामार्ग नगरपंचायतीच्या ताब्यात घ्यावा याकरिता खास सभा बोलावली होती. बोटावर मोजण्याइतक्या दारू दुकानदारांच्या फायद्यासाठी महामार्ग ताब्यात घेण्याचा ठराव करण्यात आला. या ठरावाला विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी मात्र ठाम विरोध केला.

Nagarpanchayt Mangaon Marathi

काय आहेत विरोध करण्यामागची कारणे?

माणगांव नगरपंचायतीने २ कि. मी महामार्ग आणि जिल्हा महामार्ग ताब्यात घेतले तर त्याच्या दुरुस्तीसाठी लागणारा करोडो रुपयांचा निधी नगरपंचायत कुठून आणणार? असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

माणगांव नगरपंचायतीला दीडवर्ष झाली पण मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष

महामार्ग ताब्यात घेण्यासाठी माणगांव नगरपंचायत एकीकडे सभा बोलावून ठराव घेताना आपल्याला दिसत आहे तर दुसरीकडे नगरपंचायतच्या हद्दीत असणारे अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. माणगांवमधील मुख्य रस्ता असणाऱ्या कचेरी रोडची दुरावस्था झालेली असताना नगरपंचायतिचे त्याकडे दुर्लक्ष आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच माणगांवमधील अंतर्गत रस्त्यांची देखील दयनीय अवस्था झालेली आहे. त्यामुळे अंतर्गत रस्ते दुरुस्थ करू न शकणारी नगरपंचायत महामार्ग ताब्यात घेऊन ते रस्ते तरी कुठून दुरुस्त करेल असा प्रश्न सामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे.

Mangaon Kacheri Road

माणगांव ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली. मात्र फक्त घरपट्टी, पाणीपट्टी व इतर कागदपत्रे काढण्यासाठीचे पैसे वाढले बाकी काहीही बदल झालेले पाहायला मिळालेले नाहीत. मग तो रोडची दुरावस्था, कचऱ्याचा किंवा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो. पिण्याच्या पाण्याची कमतरता असताना त्या प्रश्नाकडे लक्ष न देता नगरपंचायत प्यायला दारू नाही याकडे लक्ष देताना दिसते, हे मात्र विशेषच आहे.

त्यामुळे माणगांव नगरपंचायतीचे मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष, पण दारू विक्रीकडे भर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

नवीन बातम्यांसाठी पाहत राहा न्युज मराठी.

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.