Ultimate magazine theme for WordPress.

केंद्र शासनाच्या बचत लँम्प योजनेतून माणगांव शहर एलईडी बल्बने लखाकले – मात्र अडीच वर्षाच्या काळोखातुन उजेडाचं श्रेय जातंय कोणाला ?

शिवसेना-राष्ट्रवादी पक्षाचे आरोप प्रत्यारोप चालू.. त्यावर उजेड पाडणारा लेख..

0 25,419

माणगांव (२७ ऑगस्ट २०१८) – माणगांव नगरपंचायत हद्दीत एलईडी बल्ब लावून शहराला काळोखातुन उजेडात आणन्याचे काम सुरु आहे. पण काही प्रभागात प्रकाश दिसू लागताच आम्हीच हे काम कसे काय मंजूर केले यासाठी मागील अडीच वर्ष सत्तेत राहिलेल्या राष्ट्रवादी पक्षाकडून श्रेय घेण्याचे काम करण्यात येत आहे. याआधी माणगांव शहरामध्ये सीएफएल बल्ब असल्यामुळे त्यांचा प्रकाश अतिशय कमी होता व सारखे हे बल्ब नादुरुस्त असल्यामुळे अर्ध्याहून जास्त माणगांव शहर काळोखातच असायचं, त्यामुळे नागरिक त्रस्त होते. याची दखल घेऊन राष्ट्रवादीचे आ. सुनील तटकरेंनी स्वतः प्रयत्न करून माणगांव नगरपंचायत प्रकाशमय होण्यासाठी अंब्रेला योजने अंतर्गत करार घडवून आणल्याचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सांगत आहेत.

काय आहे नक्की एलईडीच सत्य?

मुळात आधी एक समजून घेतले तर केंद्र शासनाच्या बचत लँम्प योजनेतून माणगांव शहर प्रकाशमय झाले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या विकास योजनेचे राष्ट्रवादी श्रेय घेताना दिसत आहे. केंद्र व राज्य सरकार भाजपा शिवसेनेचे आहे, त्यांनी मंजूर केलेल्या विकास योजना मात्र राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हि योजना आम.तटकरे यांनीच मंजूर केली आहे असे भासवत आहेत. त्यामुळे माणगांव शहरातील पथदिव्यांचे श्रेय त्यांना न जाता केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपा शिवसेनेला जात आहे असे निदर्शनास येते.

माणगांवच्या नगराध्यक्षा योगिता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली माणगांव शहरात केंद्र सरकारच्या बचत लँम्प योजनेतून नवीन दिवे लावण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण माणगाव रात्रीचे लखाकत आहे. येत्या काही दिवसात हे दिवे लावण्याचे काम पूर्ण होणार आहे.

नगरपंचायतीच्या कामांना देखील वेग

पाण्याच्या टाकी जवळ स्वच्छता करून घेताना नगराध्यक्ष योगिता चव्हाण स्वतः उपस्थित असतानाचे छायाचित्र

माणगांवमध्ये सत्ता परिवर्तन होऊन एक महिन्याचा कालावधी पूर्ण होताच नगरपंचायतीच्या कामांना देखील वेग आला आहे. राष्ट्रवादीकडून हि सत्ता शिवसेनेने अडीच वर्षातच हिसकावून घेतली. राष्ट्रवादीच्या काळात जी काम होऊ शकली नाहीत. अशी कामे शिवसेना करून घेण्यास अग्रेसर असल्याचे दिसून येत आहे. माणगांवच्या नगराध्यक्षा योगिता चव्हाण यांनि नगराध्यक्ष होताच पाण्याच्या प्रश्नाकडे लक्ष देऊन बंद पडलेल्या मोटार आधी दुरुस्त करण्यास प्राधान्य दिले. माणगांव स्वछ असावे कचऱ्याचा प्रश्न सोडवता यावा नागरिकांच्या समस्या जाणून घ्याव्या यासाठी “आपली माणगांव नगरपंचायत” नावाने व्हाट्सअँप ग्रुप तयार करून स्वतः त्यांच्या समस्यांकडे लक्ष देऊन, त्वरित कारवाई केली जात आहे.

माणगांवकरांना मात्र एलईडी बल्ब कोणी लावलेत? यापेक्षा आपल्या घरासमोरील पथदिव्यांवर प्रकाश आहे यात समाधान आहे.

नवीन बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी.

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.