Ultimate magazine theme for WordPress.

महालक्ष्मी कंस्न्ट्रकशनमुळे परिसरातील वसाहतीला त्रास, जीवीतहानी होण्याची देखील शक्यता

0 870

१२ सप्टेंबर २०१८ (माणगांव): महालक्ष्मी कंन्स्ट्रकशनचे माणगांव शहरातील काम सध्या जोरात सुरु आहे. जाहीरातबाजी करण्यात हे अगदी पटाईत असल्यामुळे अगदी मराठी चित्रपट सिनेतारे तारकांकडुन माणगांव मधील प्रोजेक्टची विडीओ जाहीरात बनवली. मात्र हा जाहीरातीचा व्हिडीओ लोकांपर्यंत कमी प्रमाणात पोहचला. आपले फलक तयार करुन कोणत्याही ठिकाणी परवानगी न काढता कोठेही लावण्यात हे पटाईत आहेत.

महालक्ष्मी कंन्सट्रक्शनमुळे सध्या त्याच्या बाजुच्या परिसरातील वसाहतीला त्रास होत आहे. चौथ्या- तिसर्या स्लैब वरुन विटा माती वाळुचा लगदा वरुन खाली फेकतात त्यामुळे आजुबाजुच्या परिसरात व घरामध्ये धुळ होते. वीट आणि खडीचे तुकडे बाजुतील घरांच्या कंपाउंडध्ये जातात. त्यामुळे एवढ्यावरुन पडणा-या वीटेंमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. अशा कामकाजामुळे लोकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. एक आठवड्या आधीच तेथे काम करण्या-या एका कारागिराचा अपघात होऊन पायाला गंभीर दुखापत झाली. सुदैवाने तो वाचला.

संतप्त झालेले परिसरातील नागरीक अशा या आगाऊ बिल्डरवर कारवाई करण्यासाठी तक्रार करण्याच्या तयारित आहेत.

नवीन बातम्यांसाठी पाहत राहा न्युज मराठी.

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.