Ultimate magazine theme for WordPress.

पाईप लाईन लिकेज पाहायला सफाई कामगार – माणगांव नगरपंचायतीचा गचाळ कारभार

0 3,002

माणगांव (१४/१२/२०१७): माणगांव नगरपंचायतीच्या काम करण्याच्या पद्धतीवर सर्वसामान्य माणगांवकर अतिशय संतप्त आहे. कचेरी रोड अजुनही न करु शकल्यामुळे नागरिक खुप त्रस्त झाले आहेत. थंडीच्या दिवसात पडणा-या सकाळच्या धुक्या सारखे दिवसभर कचेरी रोडवर उडणा-या धुळीमुळे माणगांव मधील धुक संपतच नाही आहे. त्यामुळे नागरिकांचे स्वास्थ धोक्यात येत आहे. अनेक वेळा तक्रारी करुन सुद्धा कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.

मुख्याधिकारी देतात फसवी आश्वासन

Kacheri Road Mangaon

पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन अनेक ठिकाणी लिकेज असल्याचे वारंवार निदर्शनास आणुन देखील त्याची दुरुस्ती केली जात नाही. पाण्याच्या टाकीवर वडाचे झाड आल्यामळे टाकी लिकेज झाली आहे त्वरित साफसफाई करुन घेणे आवश्यक असल्याचेे वारंवार भेट घेऊन सांगुन सुद्धा मुख्याधिकारी लक्ष देत नसल्यामुळे आता नेत्यांपेक्षा मुख्याधिकारी आश्वासन देत असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रत्येक वेळेला लगेच काम करुन घेतो असे सांगुन फसवा दिलासा दिला जातो.

नगरपंचायतीचा गचाळ कारभार

Dattanagar Pani Taki

वारंवार पाठपुरावा केल्यामुळे अखेर नगरपंचायतीकडुन पाईप लाईन लिकेजच काम पाहायला एक कर्मचारी पाठवण्यात आला. पाईप लाईन लिकेज पाहायला सफाई कर्मचारी पाठवण्यात आला. ज्याने स्वत: मला पाईप लाईनच काही कळत नसल्याचे सांगितले. मग नक्की हा कर्मचारी करणार तरी काय?

कर्मचारी मुख्याधिका-यांना जुमानत नाहित – विरोधी पक्षनेते सचिन बोंबले

Sachin Bomble Mangaon Nagarpanchayat

विरोधी पक्षनेते सचिन बोंबले आणि स्वी. नगरसेवक नितीन बामगुडे यांना घडलेला प्रकारा बाबत विचारणा केली असता, सचिन बोंबले यांनी कर्मचारी मुख्याधिका-यांच्या शब्दाला जुमानत नसल्याचे सांगितले.

परखड मत पण सत्य परिस्थिती

याआधी देखील माणगांव नगरपंचायत विरोधी पक्षनेते सचिन बोंबले यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले होते कि, “मी स्वतः नवीन नळ कनेक्शन टाकण्यासाठी पाणीपुरवठा सभापतींना सांगत आहे तर ते काम करण्यास कर्मचारी अपुरे पडत असल्यामुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत. जनतेची कामच जर कर्मचारी नाहीत असं कारण सांगून तुम्ही करत नसाल, तर कर्मचारीच नाहीत मग माणगांव नगरपंचायतीला टाळ लावून टाका.” असं परखड मत त्यांनी व्यक्त केल होतं.

नवीन बातम्यांसाठी पाहत राहा न्युज मराठी.

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.