Ultimate magazine theme for WordPress.

तोतया पोलीस बनुन ताम्हाणी घाटात वाहनांना लुटणारी चोरांची टोळी जेरबंद

माणगांव पोलीसांची दमदार कारवाई

0 534

रायगड (माणगांव): माणगांव-पुणे मार्गामधील ताम्हाणी घाटात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला होता. रायगड मधुन पुण्याला जोडणारा हा महत्वाचा मार्ग असल्याने येथे वाहनांची रहदारी जास्त असते. तसेच विळे भागाड पोस्को कंपनीच्या मालाची वाहतुक करणारी वाहने देखील मोठ्या प्रमाणात असतात.

रात्री अंधाराचा फायदा घेत वाहने रस्त्यात अडवून आपण पोलिस असल्याचे सांगत चालकांकडून जबरदस्तीने पैशाची मागणी करुन फसवनारी टोळी गेली अनेकदिवस ताम्हाणी घाटात लुट करित होती. सफेद मारुती कारवरती पोलीसांची पाटी लाऊन ही टोळी गाड्या थांबवायची. चालकांकडून खोटी कारणे दाखवत पैसे मागण्यात येत होते. पैसे न दिल्यास या बनावट पोलीसांकडून दादागिरी आणि मारहाणदेखील केली जात होती. पोलिसच अस करत असल्याचे समजुन आणि लुटीची रक्कम कमी असल्याने तक्रार देण्यास कोणी जात नव्हते.

याबाबत कळुन देखील ही चोरट्यांची टोळी पोलीसांना सापडत नव्हती. माणगांव पोलीसांनी आपली व्युहरचना आखायला सुरुवात केली. अखेर मिळालेल्या खबरीनुसार कारवाई करीत माणगांव पोलीसांनी पो.नि. विक्रम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगारांना रंगेहात पकडत ताब्यात घेतले. ३१ जुलै २०१८ रोजी माहिती मिळाल्याबरोबर माणगांव पोलीसा घटनास्थळी पोहचले. याप्रकरणी चौघांना रंगेहात पकडुन अटक करण्यात आली.

अटक करते वेळी सफेद रंगाची कार नं. एम. एच. ०४ ई. क्यु ६४५७ व त्यातील ४ घे जण, १) समाधान यंका साबळे (२६) रा. वरसे ता. रोहा,जि. रायगड, २) विशाल संभाजी वाघमारे (३०), रा. शिवभक्ती पार्क बिल्डींग, भाटे वाचनालय जवळ रोहा, ता. रोहा जि.रायगड, ३) दिनेश दामोदर सकपाळ (२२) रा. वरसे, ता. रोहा, जि. रायगड, ४) विजय जगमोहन भोई (४०) रा. वरसे ता. रोहा, जि. रायगड यांना रंगेहात पकडुन त्यानी जबरीने लुटुन घेतलेले पैसे ३८७०/- रु. तसेच पोलीसाची पाटी, मारहाण, केलेला लोखंडी पाना, कार, पोलीसांनी जप्त केली.

माणगांव पोलीस ठाण्यात कॉ. गु. रजि. नं. १३४/२०१८ भा. द. वी. सं. कलम १७०, ३४१, ३२३, ३९४, ३४ अन्वये दि. ३१ जुलै २०१८ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १ ऑगस्ट २०१८ रोजी आरोपींना न्यायालयात हजर केले असता माणगांव न्यायालयाने त्यांना दि. ४ ऑगस्ट २०१८ पर्यंत पोलीस कस्टडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

नवीन बातम्यांसाठी पाहत राहा न्युज मराठी.

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.