Ultimate magazine theme for WordPress.

महेंद्र सिंह धोनीचा मोठा निर्णय, वन डे आणि टी-२० टीमच कर्णधार पद सोडलं

0 62

४ जानेवारी २०१७: भारताचा यशस्वी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याने वन डे आणि टी-२० टीमच कर्णधार पद सोडल आहे. बीसीसीआई ने ट्वीट करून महेंद्र सिंह धोनी याने कर्णधार पद सोडल्याची माहिती दिली आहे. महेंद्र सिंह धोनी याने कर्णधार पदाचा राजीनामा दिल्यामुळे आता कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली याच्याकडे कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात येऊ शकते.

dhoni-news

महेंद्र सिंह धोनीची कारकीर्द

महेंद्र सिंह धोनी भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो.
महेंद्र सिंह धोनीची वन डे मध्ये सुरवात चांगली झाली नाही. पण त्याच्या ५ व्या वन डे मध्ये १४८ रन्स पाकिस्तान विरुद्ध करून संघात आपलं स्थान पक्क केलं.
महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वात भारताने १९९ वन डे आंतरराष्ट्रीय सामने खेळत, ११० सामने तो जिंकले असून ७४ सामन्यात पराभव झाला आहे. कर्णधार म्हणूम धोनी ७२ टी-२० सामने खेळला असून त्यापैकी ४१ सामन्यांत विजय तर २८ सामन्यात भारताला हार स्वीकारावी लागली आहे.
महेंद्र सिंह धोनीने टेस्ट क्रिकेटला आधीच कसोटी क्रिकेटला अलविदा केला आहे. महेंद्र सिंह धोनी ९० कसोटी सामने खेळला आहे. त्यातले ३६ सामने भारत जिंकला असून २४ सामन्यात पराभव झाला आहे आणि ३० सामने ड्रॉ झाले आहेत.
धोनीने ९० टेस्ट मध्ये ३८.०९ च्या सरासरीने ४,८७६ धावा केल्या आहेत (सर्वोत्कृष्ठ २२४). त्यात ६ अर्धशतक आणि ३३ शतक केले आहेत. तर धोनी आत्त्तापर्यंत २७५ वन डे खेळला असून ५०.८९ च्या सरासरीने त्याने ९,११० धावा केल्या आहेत (सर्वोत्कृष्ठ १८३*).
महेंद्रसिंग धोनी आयसीसी २००८-२००९ या वर्षातील सर्वोत्कृष्ट वन डे खेळाडू ठरला आहे.
धोनी कर्णधार असताना २००७ चा ट्वेंटी-२० विश्वचषक, २०११ चा विश्वचषक आणि २०१३ साली चॅम्पियन्स ट्रॉफी या महत्वाच्या स्पर्धांमध्ये धोनीने भारताला विजेतेपद मिळवून दिले आहेत.

काय असू शकत धोनीने राजीनामा देण्याचं कारण?

dhoni-best-indian-captain

माजी कर्णधार सौरव गांगुलीने टीका केली होती कि, धोनीने चांगली कामगिरी केली असली तरी त्याने आजून किती दिवस हे पद संभाळावे?, २०१९ मध्ये वर्ल्डकप होणार आहे. त्यामुळे पुढील चार वर्षे धोनी जबाबदारी संभाळू शकतो का? असे प्रश्न उपस्थित केले होते.
या सूचनेकडे लक्ष्य देऊन धोनीने युवा खेळाडूंच्या हातात कर्णधार पद द्यावे यासाठी राजीनामा दिला असू शकतो. कर्णधारपद सोडले तरी धोनी भारताच्या वन डे आणि ट्वेंटी-२० संघातून खेळत राहणार आहे.

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.