Ultimate magazine theme for WordPress.

छगन भुजबळांना दोन वर्षांनंतर जामीन मंजुर

आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यात केलेले बदलांचा छगन भुजबळांना जामीन मंजुरीसाठी फायदा

0 406

मुंबई (०४ मे २०१८): राष्ट्रवादीपक्षाचे नेते छगन भुजबळ यांना पाच लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजुर झाला आहे. १४ मार्च २०१६ पासुन छगन भुजबळ तुरुंगात होते. बेहीशेबी मालमत्तेच्या प्रकरणात छगन भुजबळांना तुरुंगात टाकण्यात आले होते. परंतु आता जामीन भेटल्यामुळे तुरुंगाच्या बाहेर येण्याचा भुजबळांचा मार्ग मोकळा झाला. मुंबई हायकोर्टाने छगन भुजबळांचा जामीन मंजुर केला. सर्वोच्च न्यायालयाने काही महीन्यांपुर्वी आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यात केलेले बदलांचा छगन भुजबळांना जामीन मंजुरीसाठी फायदा झाला. नाशिकमध्ये भुजबळ समर्थकांमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे.

छगन भुजबळांना अटक का केली होती?

बेहिशेबी मालमत्ता आणि पैशांची मोठ्याप्रमाणात अफरातफर प्रकरणात ईडीने छगन भुजबळांना अटक केली होती. भुजबळांना १४ मार्च २०१६ ला अटक करण्यात आली होती. ११ तास छगन भुजबळांची चौकशी केली आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती.

ईडी तपास करत असलेलं प्रकरण मनी लाँडरिंग म्हणजे पैशाच्या अफरातफरीचं म्हणजेच ब्लॅकमनी व्हाईट करण्याचं आहे. छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या वेगवेगळ्या पैशांच्या अफरातफरीच्या प्रकरणात सरकारला ८८० कोटी रुपयांचा फटका बसला असल्याचा आरोप आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी मनी लाँडरिंग कायद्याखाली छगन भुजबळ सध्या अटकेत आहेत.

नवीन बातम्यांसाठी पाहत राहा न्युज मराठी

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.