Ultimate magazine theme for WordPress.

व्यवहारासाठी नवीन “भिम” अँप साठी ना स्मार्टफोनची गरज लागणार आहे ना इंटरनेटची

0 77

नवी दिल्ली: नवी दिल्ली येथे डीजीधन मेला या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅशलेस व्यवहारावर भर देत आणखी एक महत्वाची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीजीधन मेला या कार्यक्रमात भिम अँप लाँच केला आहे. या अँप साठी इंटरनेटची गरज लागणार नाही तसेच स्मार्टफोनही गरजेचा नाही असं हि ते म्हणाले. या अँप मुळे व्यवहार करणे सोप्पे होऊन फक्त अंगठ्याच्या वापर करून तुम्ही व्यवहार करू शकतात. फक्त अंगठा लावून पेमेंट करता येणार असल्याचं मोदी बोलले. मोदींनी सांगितलं, भिम अॅप गरिबांच्या घरातील आर्थिक महासत्ता असेल.

new-marathi-modi-digi-dhan

भारतरत्न डॉ. बाबासाहेब भिमराव आंबेडकर यांच्या नावावरून या अँपच नाव

भारतरत्न डॉ. बाबासाहेब भिमराव आंबेडकर यांच्या नावावरून या अँपच नाव ठेवण्यात आल आहे. त्यांच्या भिमराव नावावरूनच अँपला “भिम” असे नाव देण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं.

मोदी म्हणाले, आता तुमचा अंगठाच तुमची ओळख असणार, अशिक्षिताला अंगठे बहाद्दर म्हटलं जायचं, पण आता काळ बदललाय.

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.