Ultimate magazine theme for WordPress.

५०० आणि १००० च्या नोटा झाल्या बंद – पंतप्रधान मोदी

0 9

पंतप्रधान मोंदींनी काळया पैशाविरुद्ध घेतला आहे एक ऐतिहासिक निर्णय काही प्रमाणात गंभीर आणि महत्व पूर्ण आहे. पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवार ८ नोव्हेंबर २०१६ च्या मध्यरात्रीपासून ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून रद्द करण्यात येणार आहेत.

narendra-modi-500-1000

५०० आणि १००० च्या नोटांचा आता काय करायचं?

आता प्रत्येकाला असा प्रश्न पडला असेल कि ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांचा काय करायचं? तर अजिबात चिंता करू नका. पंतप्रधान मोदी म्हणाले, १० नोव्हेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत नागरिकांना त्यांच्याकडे असलेल्या पाचशे आणि एक हजाराच्या नोटा बँक किंवा पोस्ट ऑफिसात जमा करता येतील. ५० दिवसांच्या कालावधीत नागरिकांना ५००-१००० च्या नोटा बदलून घेता येतील. मात्र ९ नोव्हेंबरपासून ५००-१००० च्या नोटा कायदेशीररित्या बंद असून त्यांचं महत्त्व कागदाच्या एका तुकड्याइतकं असेल.

उद्या एटीएम मशिन्स असणार बंद

देशभरात ९ नोव्हेंबर रोजी सर्व एटीएम मशिन्स बंद राहणार आहेत. तर दहा तारखेलाही काही ठिकाणी एटीएम मशिन्स बंद राहतील. १००० आणि ५०० च्या नोटा रद्द झाल्या आहेत. त्यामुळे एटीएम मध्ये १०० च्या नोटा भरण्यासाठी १००० आणि ५०० च्या नोटा बदलण्यासाठी बंद असल्याचं सांगण्यात आलं आहे.

पंतप्रधान मोदींच आव्हाहन

narendra-modi-corruption

पैसे जमा करताना घाई-गडबड करु नका, तुमचे पैसे तुमचेच आहेत, सध्या चार हजार रुपयांपर्यंतची रक्कम (पाचशे आणि हजारच्या नोटा) बदलून घेता येतील. पॅनकार्ड, आधारकार्ड यासारखी ओळखपत्र दाखवून नोटा बदलून मिळतील. 10 नोव्हेंबरपासून ही मर्यादा वाढवण्यात येईल.

ज्यांना ३० डिसेंबरपर्यंत काही कारणाने सर्व नोटा बदलून घेता येणार नाहीत, त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करुन ३१ मार्च २०१७ पर्यंत नोटा बदलून घेता येतील.

रुग्णांची असुविधा टाळण्यासाठी पुढील ७२ तास म्हणजे ११ नोव्हेंबरच्या रात्रीपर्यंत डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर औषध खरेदीसाठी पाचशे आणि हजाराच्या नोटा स्वीकारल्या जातील. परदेशात प्रवास करत असलेल्या व्यक्तींना, काही महत्त्वाच्या ठिकाणी (रुग्णालयं, पेट्रोल पंप, सीएनजी पंप, रेल्वे आणि बस तिकीट काऊंटर, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विमानतळं, स्मशान इत्यादी) ११ तारखेपर्यंत पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांनी व्यवहार करण्याची मुदत देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.