Ultimate magazine theme for WordPress.

रायगडचे डॉ.अजय मोरे यांचा सिंगापूरमध्ये सन्मान । जय मोरे याची झी मराठी “चला हवा येऊ द्या” मध्ये निवड

झी मराठी चॅनेल वरील सुप्रसिद्ध कॉमेडी मालिकेच्या नवीन भागांसाठी पुणे येथे ओडिशन मध्ये निवड

0 101,906

रायगड: रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्यात तळेगांव सारख्या खेडे गांवात मागासवर्गीय कुटुंबात जन्मलेले डॉ.अजय मोरे यांच्या संगणक शिक्षण, सामाजिक व सांस्कृतिक कार्याची दखल घेत बुधवार दि.०१ ओगस्ट २०१८ रोजी ली मारिडीन, सेंटोसा-सिंगापूर येथे आंतराष्ट्रीय सोहळ्यात त्यांचा सन्मान मलेशिया, सिंगापूर, कॅनडा, इंडोनेशिया, चीन, नेपाळ, भूतान, श्रीलंका, दुबई आणि अमेरिका येथून आलेल्या प्रमुख पाहुण्याच्या समोर सन्मान करण्यात आला. अशा प्रकारे डॉ.अजय मोरे यांनी आपल्या रायगडचे नाव व आपल्या कार्याची मराठी पताका सातासमुद्रापार फडकवली आहे.

सिंगापूर येथील अंतराष्ट्रीय सोहळ्यात ‘लास्ट वन’ लघुचित्रपट, किल्ले मानगड वेब सिरीज भाग १, रायगड इन्स्टिट्यूट ऑफ आय.टी.माणगांव संस्थेची बायोस्कोपी सर्वांचे प्रदर्शन

सिंगापूर येथील अंतराष्ट्रीय सोहळ्यात डॉ.अजय मोरे यांच्या रायगड इन्स्टिट्यूट ऑफ आय.टी.माणगांव या संस्थेची बायोस्कोपी तसेच रायगडच्या मातीतील या वेब सिरीज मधील भाग १ किल्ले मानगड या डॉक्युमेंटरी फिल्मचे तसेच माणगांवमधील स्थानिक कलाकारांना घेवून ‘लास्ट वन’ हा एक सामाजिक लघुचित्रपट तयार केला आहे. या सर्वांचे प्रदर्शन केले गेले. मलेशिया, सिंगापूर, कॅनडा, इंडोनेशिया, चीन, नेपाळ, भूतान, श्रीलंका, दुबई आणि अमेरिका येथून आलेल्या प्रमुख पाहुण्याच्या समोर करण्यात आले सर्व उपस्थित पाहुण्यांनी सदर कलाकृतीला भरभरून प्रतिसाद दिला.

डॉ.अजय मोरे यांचा रायगड जिल्ह्यातील सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार

गेल्या १० वर्षापासून डॉ.अजय मोरे हे रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थांना अल्प दरात दर्जेदार संगणक शिक्षण देण्यात महारष्ट्रात अग्रेसर आहेत. सध्या रायगड जिल्हात १८ कॉम्प्युटर सेंटर ते चालवीत असून दिवसेंदिव विद्यार्थाची संख्या वाढत आहे. मोरे एज्युकेशन सोसायटी मार्फत विद्यार्थांना मार्गदर्शन देण्यासाठी अनेक सामाजिक उपक्रम ते राबवीत आहेत. एक आवड व छंद जतनकरीत परमेश्वरानी दिलेलेली देणगीचा स्थानिक कलाकारांना वापर व्हावा या हेतूने अष्टविनायक कला अकादमी,माणगांव या नाट्य संस्थेची स्थापना त्यांनी केली. जय हो !, धुमाकूळ मनोरंजनाचा, गौरव मराठी केलेचा हे कार्यक्रम यशस्वीरीत्या त्यांनी राबविले.

माणगांवचे कलाकार चित्रपटात दिसावेत व त्यांच्या कलेचा प्रसार अंतराष्ट्रीय स्तरावर व्हावा या हेतूने अष्टविनायक फिल्म क्रिएशन्स हि चित्रपट निर्मिती संस्था स्थापन केली असून या संस्थेच्या माध्यमातून जिद्द, रंग प्रीतीचा, मिशाप, झापड, ई-मेल या यशस्वी लघुचित्रपटाची निर्मिती केली असून याच्या पुढे जावून एक सामजिक व थरारक ‘लास्ट वन’ हि एक जबरस्त फिल्म तयार केली. सध्या वाटसअप व फेसबुकवर या फिल्मच्या प्रोमोला रसिक प्रेष्कानी जबरदस्त प्रतिसाद दिला आहे.सध्या भिंगरीचा खेळ सारा… हे गाण प्रेष्कांच्या चांगले पसंतीस उतरले आहे. अल्प कालावधीमध्ये जवळ जवळ लाखो लोकांनी पसंती दिली असून सर्व प्रेषक हि फिल्म पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

जय मोरे याची झी मराठी “चला हवा येऊ द्या” मध्ये निवड

आनंदाची बातमी म्हणजे रविवार दि.०५ ओगस्ट २०१८ रोजी चला हवा येवू द्या !… या झी मराठी चॅनेल वरील सुप्रसिद्ध कॉमेडी मालिकेच्या नवीन भागांसाठी पुणे येथे ओडिशन घेण्यात आले यामध्ये डॉ.अजय मोरे यांचे चिरंजीव जय मोरे वय २.५ वर्षे याची अभिनय क्षमता व हुशारी पाहून निवड करण्यात आली आहे. खुद्द लेखक अरविंद जगताप, योगेश शिरसाट व डॉ.निलेश साबळे यांनी त्याचे कौतुक केले.

ज्या रायगडच्या मातीत जन्म घेतला त्या मातीचे नाव व कलाकारांचा विकास आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणाऱ्यां डॉ.अजय मोरे यांच्या विशेष कार्याचे समस्त रायगडकरांच्या वतीने कौतुक व खूप खूप शुभेच्छा देण्यात येत आहेत.

नवीन बातम्यांसाठी पाहत राहा न्युज मराठी.

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.