Ultimate magazine theme for WordPress.

पंचायत समिती निवडणुकींच्या रणधुमाळामध्ये भाई दसवते यांना जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा

0 54

माणगांव(रायगड): जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूका पंचायत समिती २०१७ निवडणुकीच्या चर्चा आता प्रत्येक गावा-गावात, चौका-चौकात सुरु झाली आहे. यावेळी साई-खरवली विभागातील पंचायत समितीचे गणा करता कै. सितारामजी दसवते यांचे सुपुत्र तसेच रायगड जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे संचालक व कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य वकील सुशीलकुमार (भाई) सिताराम दसवते यांना जनतेची पसंती आहे.

bhai-dasvte-mangaon

सुशीलकुमार दसवते यांच्या मनमिळावु आणि शांत स्वभावामुळे ते येथील तरुणांचे लाडके नेतृत्व आहेत. माणगांव तालुक्यातील संयमी नेतृत्व अशी सुद्धा त्यांची ओळख आहे. त्यामुळे येणाऱ्या पंचायत समितीच्या निवडणुकींच्या रणधुमाळामध्ये  भाई दसवते यांना जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा असल्याचे दिसून येत आहे.

पंचायत समितीच्या निवडणूका जशा जवळ येत आहेत तशी लोकांमध्ये त्याबद्दल उत्सुकता वाढत आहे.

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.