Ultimate magazine theme for WordPress.

तासगांवमध्ये तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत निजामपूरचा नवे नगर संघ विजयी

0 2,033

निजामपूर (तासगांव – २ एप्रिल २०१७): शिवसेना शाखा तासगांव आयोजित व निजामपूर कबड्डी असोसिएशन यांचे अंतर्गत खुल्या पुरुष गटाचे सामने दि. १ व २ एप्रिल रोजी तासगांव खेळवण्यात आले होते. शिवसेनेचे महाड-पोलादपूर-माणगांवचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी देखील सामने पाहायला उपस्थितीती लावली होती. या झालेल्या पुरुष गटाच्या रोमांचकारक फायनल सामन्यात नवे नगर आणि कोस्ते बुद्रुक संघात अटी-तटीची लढत झाली. या फायनल सामन्यात नवे नगर संघ विजयी झाला. नवे नगर संघाने शिवसेना शाखा तासगांव आयोजित कबड्डी स्पर्धा २०१७ चषक जिंकलेले आहे. अतिशय चांगला खेळ करत द्वितीय क्रमांक कोस्ते बुद्रुक संघाला मिळालेला आहे. तृतीय क्रमांक भिरा संघाने पटकावला आहे. तर या स्पर्धेत चतुर्थ क्रमांक भाले आदीवासी वाडी संघाने पटकावला आहे.

Tasgaon Kabaddi 2017 Bharatsheth

शिवसेना शाखा तासगांव आयोजित कबड्डी स्पर्धा २०१७

प्रथम क्रमांक – नवे नगर

द्वितीय क्रमांक – कोस्ते बुद्रुक

तृतीय क्रमांक – भिरा

चतुर्थ क्रमांक – भाले आदीवासी वाडी

Tasgaon Kabaddi 2017

तासगांव शिवसेना शाखा प्रमुख आणि अध्यक्ष निजामपूर कबड्डी असोसिएशन श्री. ज्ञानेश्वर उतेकर यांनी १ व २ एप्रिल २०१७ रोजी तासगांव येथे आयोजित कबड्डी स्पर्धेत चांगल्या प्रकारे केलेल्या सहकार्याबद्दल कबड्डी खेळाडू व प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. या पुढेही चांगल्या स्पर्धेचे आयोजन करण्याचा आपला प्रयत्न असेल असं श्री. ज्ञानेश्वर उतेकर यांनी सांगितलं.

नवीन बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी.

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.