Ultimate magazine theme for WordPress.

पहा “ती सध्या काय करते” मराठी चित्रपटात नवीन ट्विस्ट

0 97

अंकुश चौधरीचा सध्या चर्चेत असणारा “ती सध्या काय करते” मराठी सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. जस आधी आपण टीझरमध्ये पाहिलं होत, हा चित्रपट एक साधी सिम्पल पहिल्या प्रेमाची गोष्ट असणार आहे. पण नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये उर्मिला कानिटकर – कोठारे हिच्या एक झलकमुळे कहाणीमध्ये नवीन ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे.

काय आहे नक्की ट्विस्ट?

“ती सध्या काय करते” सिनेमाच्या ट्रेलरमध्ये जस आपण पाहिलं गोष्ट आहे पहिल्या प्रेमाची आणि पाहिलं प्रेम कोणी विसरू शकत नाही ते आयुष्यभर कोणी विसरत नाही असं सांगणारा हा ट्रेलर आहे. अन्या कसा लहानपणापासूनच तन्वीच्या प्रेमात पडतो आणि जसे-जसे ते मोठे होतात तसा त्यांच्यात येणारा दुरावा पाहायला भेटतो. अंकुशने मोठ्या अन्याची आणि तेजश्री प्रधानने मोठ्या तन्वीची भूमिका केली आहे. अन्या आणि तन्वीच्या प्रेम कहाणीमध्ये उर्मिला कानिटकर – कोठारेच्या एका झलकमुळे तिचा नक्की काय रोल आहे? हा प्रश्नच सगळ्यांना पडला आहे.

“ती सध्या काय करते” चित्रपटात अंकुश चौधरी, तेजश्री प्रधान, अभिनय बेर्डे आणि आर्या आंबेकर प्रमुख कलाकार आहेत. उर्मिला कानिटकरच्या एन्ट्रीने उत्सुकता अजूनच वाढवलेली आहे. ती सध्या काय करते सिनेमा ६ जानेवारी २०१७ ला रिलीज होणार आहे.

पहा ट्रेलर:

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.