Ultimate magazine theme for WordPress.

टी.व्ही कलाकार अतुल वीरकर घेऊन येतोय “समज-एक ताकीद” शॉर्ट फिल्म

0 843

रायगड: माणगांवचा टी.व्ही कलाकार अतुल वीरकर नेहमी आपल्याला वेगवेगळ्या मालिकांमध्ये दिसत असतो. अतुल वीरकर याची “समज-एक ताकीद” शॉर्ट फिल्म थोड्याच दिवसात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शॉर्ट फिल्मचा मुहूर्त नुकताच पार पडला. माणगांव नगर पंचायतीचे विरोधी पक्षनेते सचिन बोंबले यांच्या हस्ते मूहुर्ताचा नारळ फोडून शूटिंगचा शुभारंभ करण्यात आला.

samaz-ek-takid-short-film

“समज-एक ताकीद” शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शक संदेश अहिरे आहेत. या शॉर्ट फिल्मचा निर्माता अतुल वीरकर आहे. “समज-एक ताकीद” शॉर्ट फिल्ममध्ये मुख्य भूमिकेत विदुला कासकर आहे. तर खलनायकाची भूमिका अतुल वीरकरने साकारली आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये मुख्य सहकलाकार श्रद्धा पवार, संजय विचारे, सचिन आव्हाड, शिवम सागवेकर, राजेंद्र पवार, किरण केळुस्कर, सौरभ भोणकर, प्रसन्ना मोदी आहेत.

20170110_151347

“समज-एक ताकीद” शॉर्ट फिल्म आपल्या भेटीसाठी फेब्रुवारी २०१७ मध्ये येणार आहे. तर पाहायला विसरू नका अतुल वीरकरची “समज-एक ताकीद” शॉर्ट फिल्म.

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.