Ultimate magazine theme for WordPress.

सनातन संस्थेच्या वैभव राऊतकडून ८ देशी बॉम्ब आणि जवळपास २ डझन बाँम्ब बनविण्याचे साहित्य जप्त

एटीएसने वैभव राऊत याला अटक केली असून चौकशी सुरु आहे

0 730

मुंबई: महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने नालासोपाऱ्यात वैभव राऊत या व्यक्तीच्या घरातून मोठ्या प्रमाणात स्फोटक जप्त केली आहेत. गुरुवारी रात्री दहशतवादविरोधी पथकाने हि कारवाई केली आहे. या छाप्यात वैभव राऊतच्या घरात आठ देशी बॉम्ब मिळाले आहेत. त्याचबरोबर त्याच्याकडून जवळच असणाऱ्या त्याच्या दुकानात दोन डझन भर बॉम्ब तयार करू शकतात इतकी स्फोटक हस्तगत करण्यात आली आहेत. वैभव नाईक सनातन संघटनेचे काम करतो हे सांगितले जाते. वैभव नाईक कट्टर हिंदुत्त्ववादि सनातन संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे समोर येत असताना मात्र सनातन संघटनेचे वकील संजीव पुनाळेकर यांनी वैभव राऊत ह्याचा सनातन संस्थेशी संबंध नाही तो सनातनचा कार्यकर्ता नाही असे सांगितले आहे.

वैभव राऊतची कसून चौकशी सुरु

गुरुवारी रात्री ८ वा. च्या सुमारास याबाबत माहिती मिळताच महाराष्ट एटीएसने छापा मारला. गुरुवार रात्री उशिरा पर्यंत हि छापेमारी चालू होती. वैभव राऊतकडून ८ देशी बॉम्ब आणि जवळपास २ डझन बाँम्ब बनविण्याचे साहित्य जप्त केले. पोलिसांनी वैभव राऊतला अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरु आहे.

नवीन बातम्यांसाठी पाहत राहा न्युज मराठी.

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.