Ultimate magazine theme for WordPress.

शिवसेना कोकण विधानपरिषदेचे उमेदवार राजीव साबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला

शिवसेनेचे रत्नागिरीत जोरदार शक्ती प्रदर्शन

0 1,490

रत्नागिरी (२ मे २०१८): कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार राजीव साबळे यांनी आज रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्गातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवसेना नेते राजीव साबळे यांचे रत्नागिरीत जोरदार शक्ती प्रदर्शन

राजीव साबळे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रायगडमधुन हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते हजर राहीले होते. स्व. माजी आमदार लोकनेते अशोकदादा साबळे यांचे पुत्र आमदार व्हावे अशी सगळ्यांची इच्छा आहे. ढोल ताशाच्या गजरात रत्नागिरीत सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. रत्नागिरीतील स्वयंवर सभाग्रुहात सर्व शिवसैनिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सभा घेण्यात आली.

यावेळी केंद्रीय उद्योगमंत्री अनंत गीते, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, ग्रुहराज्यमंत्री दिपक केसरकर, रत्नागिरी पालकमंत्री ना. रविंद्र वायकर, आमदार व जिल्हा प्रमुख वैभव नाईक, खा. विनायक राऊत, आ. राजन साळवी, आ. सदानंद चव्हाण, आ. भरत गोगावले, आ. उदय सावंत तसेच तिन्ही जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.

नवीन बातम्यांसाठी पाहत राहा न्युज मराठी.

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.