Ultimate magazine theme for WordPress.

राजस्थान पहिल्या “वर्ल्ड मिक्स बाँक्सींग चँम्पीयनशिप २०१८” मध्ये माणगांव तालुक्यातील खेळाडुंनी मिळवले घसघशीत यश ३ गोल्ड, २ सिल्वर, २ ब्राँझ मेडल

0 603

रायगड: वर्ल्ड मिक्स बाँक्सींग फेडरेशन आयोजीत आणि राजस्थान मिक्स बाँक्सींग असोसिएशनने होस्ट केलेल्या पहिल्या ‘वर्ल्ड मिक्स बाँक्सींग चँम्पीयनशिप २०१८’ ही स्पर्धा ४ आणि ५ मे ला राजस्थान अलवार येथे खेळवण्यात आले.

पहिल्या ‘वर्ल्ड मिक्स बाँक्सींग चँम्पीयनशिप २०१८’ मध्ये माणगांव तालुक्यातील स्पर्धकांनी चांगले यश मिळविले आहे. या स्पर्धेसाठी माणगांव मधील मिक्स बाँक्सींग कोच विशाल दळवे यांनी आपल्या विद्यार्थांना सहभागी केले होते. स्वत: विशाल दळवे यांनी १९ वर्षांवरिल गटात सिव्लर मेडल मिळविले. तसेच १९ वर्षा खालील गटात त्यांचे शिष्य प्रेम सावंत, आर्यन दिवेकर, वैष्णवी चव्हाण यांनी गोल्ड मेडल मिळविले. तर सिद्धेश येरुणकर याने सिल्वर मेडल आणि ओम गांधी ईश्वरी कासार यांनी ब्राँझ मेडल मिळविले.

त्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल तालुक्यातुनच नाही तर पुर्ण जिल्ह्यातुन त्यांचे कौतुक केले जात आहे.

नवीन बातम्यांसाठी पाहत राहा न्युज मराठी.

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.