Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठी सीजन ५ हा अनेक कारणांनी प्रसिद्ध होत आहे. व शो ला TRP ही मिळत आहे. आणि शो मध्ये नव-नवीन ट्विस्ट पन समोर येत असल्यामुळे प्रेक्षक मोठ्या प्रमाणात शो पाहण्यास उत्सुक आहेत. अशातच आणखी एक ट्विस्ट म्हणजे संग्राम चौगुले ची एक्जिट.
नुकताच सातव्या आठवड्यात wild card entry ने आलेला संग्राम चौगुले अवघ्या 14 दिवसांमध्ये म्हणजेच आठव्या आठवड्यात घराबाहेर पडला आहे. त्याने घराबाहेर पडल्या नंतर केलेल्या instagram पोस्ट मध्ये त्याने सांगितले आहे. “काही injuries मला बिग बॉस च्या घरातून जावं लागत आहे.. पण आपली भेट लवकरच होईल तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी धन्यवाद!” असे त्याने आपल्या इन्स्टाग्राम हँडल वरून पोस्ट केले आहे.
आठव्या, आठवड्यात झालेल्या कॅप्टन्सी टास्क दरम्यान त्याच्या हाताला फ्रॅक्चर झाले असून त्याच्या पाठीला ही इजा झाल्याचे डॉक्टरां कडून झालेल्या तपासणी दरम्यान सांगण्यात आले. व त्यामूळे त्याला हॉस्पिटल मध्ये दाखल होण्यास ही सांगितले आहे. त्याला दु;खापत झाल्यामुळे घरातील कोणतेच काम करता येणार नव्हतं व कोणताच टास्क ही पूर्ण करता आले नसते. त्यामुळे संग्राम चौगुले ला बिग बॉस च्या घरातून अवघ्या 14 दिवसांत बाहेर पडावे लागणार आहे.
संग्राम चौगुलें बद्दल: संग्राम चौगुले हे मूळ कोल्हापूरचे त्यांच जन्म कोल्हापूरमध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांनी आपले शिक्षण इलेक्ट्रिकल इंजीनीरिंग मध्ये पूर्ण केले. त्याची पाहील्या पासूनच बॉडी बिल्डींग कडे रुचि होती. त्याच्या कॅरियर च्या टप्प्यात त्याला अनेक आर्थिक समस्यां मधून सामोरे जावे लागले. बॉडी बिल्डिंग ही खूप खर्चीक असल्याने त्याला आपल्या अवडीनुसार पुढे जायला खूप मेहनत घ्यावी लागली. त्याने 2012 मध्ये 85 किलो वजनी गटात ‘मिस्टर यूनिवर्स’ हा किताब जिंकला होता. संग्राम चौगुले याने सह वेळ ‘मिस्टर इंडिया’ व पाच वेळ ‘मिस्टर महाराष्ट्र’ किताब जिंकण्याचा मान मिळविला आहे.
संग्राम हे फक्त बॉडी बिल्डिंग पूर्तेच मर्यादित राहिले नाहीत तर त्यांनी मनोरंजन क्षेत्रात ही आपले पाय रोवले आहेत. Bigg Boss Marathi सारख्या रीयालिटि शो मध्ये देखील त्यांनी आपल्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. परंतु त्यांना काही करणास्थाव Bigg Boss च्या घरातून बाहेर पडावे लागले आहे. त्यांच्या फॅन्स साठी हा एक मोठा धक्काच होता.