Cotton Soybean Anudan :
राज्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, २०२३ मध्ये पावसाचे प्रमाण हे कमी झाल्याने व कापूस व सोयाबीन च्या दरांमद्धे घसरण झाल्या मुळे शेतकाऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसला.
2023 च्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी काल दि. ३०/०९/२०२४ रोजी राज्य मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली त्या बैठकी मध्ये शेतकऱ्यांसाठी अनुदान जाहीर करण्यात आले, अनुदानाचा ई-शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला शेतकऱ्यांच्या खात्यात ऑनलाइन पद्धतीने ही अनुदान जमा करण्यात आले
कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टर ५००० रुपये जास्तीत जास्त दोन हेक्टर च्या मर्यादेत अनुदान देण्यात येणार आहे.या निर्णया मार्फत पहिल्या टप्प्यात ४९ लाख ५० हजार सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी खातेदारांच्या खात्यांमध्ये २३९८ कोटी ९३ लाख रुपये जमा करन्यात येणार आहेत. तसेच राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची संख्या ही जास्त असून ती सुमारे ९६ लाख ७८७ इतकी आहे
त्यापैकी ६८ लाख ६ हजार ९२३ शेतकरी खतेदारांची माहिती पोर्टल वर भरली गेली आहे व राज्य सरकार मार्फत राबविण्यात येणाऱ्या नमो शेतकरी महासन्मान च्या महिती सोबत शेतकऱ्यांची आधारजुळणी व ७० टक्क्यांपर्यंत नावाची पडताळणी झालेल्या शेतकऱ्यांची संख्या ४१ लाख ५० हजार ६९६ इतकी आहे.
आधार जुळणी व ६९ टक्क्यांहून माहितीची पडताळणी झालेल्यांची संख्या ४ लाख ६० हजार ७३० इतकी आहे या व्यतिरिक्त आधार संमती पत्रानूसार माहिती भरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यांची संख्या १७ लाख ५३ हजार १३० इतकी आहे.
या पद्धतीने राज्य सरकार मार्फत पहिल्या टप्प्यात ४९ लाख ५० हजार शेतकऱ्यांच्या ६३ लाख ६४ हजार खात्यांवर (एक शेतकऱ्याचे अनेक खाते असू शकतात) अनुदानचे अर्थसाहाय्य जमा करण्यात येणारआहे त्यासाठी २ हजार ३९८ कोटी ९३ लाख रुपये इतकी तरतूद करण्यात आली आहे
या निर्णया मध्ये ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत, ज्यांची नमो शेतकरी सन्मान योजने मार्फत जुळणा झाली आहे अश्या ४९ लाख ५० हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे उर्वरित शेतकरी ४६.५ लाख एवढे शेतकरी पुढच्या टप्प्यात येतील.
सरकार निवडणुकी पूर्वी सर्व गोष्टींकडे लक्ष्य देत असून त्याचा फायदा शेतकार्यांना सुद्धा अनुदाना पासून होणार आहे त्यामूळे सर्व शेतकरी या निर्णयाचे स्वागत करत आहेत.
[contact-form][contact-field label="Name" type="name" required="true" /][contact-field label="Email" type="email" required="true" /][contact-field label="Website" type="url" /][contact-field label="Message" type="textarea" /][/contact-form]