News Marathi

Happy Gandhi Jayanti : टॉप 20 गांधीजींचे विचार आणि जीवन.

Happy Gandhi Jayanti!

Happy Gandhi Jayanti

गांधी जयंती आपल्या देशातील एक महत्वाचा दिवस असतो या दिवशी राष्ट्रीय सुट्टी पण असते, 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंती साजरी केली जाते. महात्मा गांधी यांनी अहिंसा आणि सत्याग्रहाच्या मार्गाने भारताच्या स्वतंत्र लढ्यात महत्वपूर्व योगदान दिले आहे. महात्मा गांधी यांना बापू किंवा राष्ट्रपिता म्हणूनही ओळखले जाते स्वतंत्र्य लढ्यातील महत्वपूर्ण व प्रभावी तत्वांमुळे त्यांना राष्ट्रपिता ही ओळख मिळाली आहे. १९४४ मध्ये सिंगापूर मध्ये रेडियो वर बोलताना नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता म्हणून संबोधित केले होते, भारत सरकार पुढे चालून राष्ट्रपिता या नावाला मान्यता दिली.

आजच्या दिवशी आपण देशवासीय महात्मा गांधी यांच्या तत्वांचे स्मरण करतो आणि त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेत असतो. गांधीजींचे जीवन आणि कर्तृत्व अनेक लोकांसाठी प्रेरणादायी आहे. करण ते फक्त स्वतंत्र संग्रामतील नेते नव्हते तर ते एक विचारवंत, तत्वज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांचे सत्य आणिअहिंसेचे विचार आजही जग विख्यात आहेत आणि आदर्श मानले जातात. त्यांच्या अहिंसात्मक तत्त्वांमुळे २ ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून घोषित केला गेला आहे.

Happy Gandhi Jayanti! जाणून घेऊयात महात्मा गांधीजी यांच्या जीवना बद्दल महिती.

नाव:  मोहनदास करमचंद गांधी 

जन्म: 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात मधील  पोरबंदर येथे

शिक्षण: त्यांचे शिक्षण लंडण येथील यूनिवर्सिटी कॉलेज लंडन येथे झाले.

मृत्यू: 30 जानेवारी 1948 (हत्या)

ज्यांना जगभरात महात्मा गांधी म्हणून ओळखले जाते त्यांचे खरे नाव मोहनदास करांचंद गांधी असे होते त्यांच्या वडिलांचे नाव कारमचंद गांधी असे व आईचे नाव पुतलिबाई असे होते.  फक्त 13 व्यय वर्षात त्यांचे लग्न लावून देण्यात आले. आणि त्यांच्या पत्नीचे नाव बा कस्तुरबा गांधी असे होते

महात्मा गांधी यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण पोरबंदर व राजकोट येथून पूर्ण केले व १९८८ मध्ये कायद्याच्या शिक्षणासाठी इंग्लंड रवाना झाले तिथे त्यांनी यूनिवर्सिटी कॉलेज ऑफ लंडन मधून आपले कायद्याचे शिक्षण पूर्ण केले.

महात्मा गांधी यांचे कायद्याचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते साऊथ आफ्रिकेला गेले. तिथे गेल्यानंतर त्यांना वर्णभेदाचा सामना करावा लागला आफ्रिकेमध्ये भारतीयांना त्यांच्या वर्णभेदा वरून होत असलेल्या वादावरुण त्यांनी निर्णय घेतला की भारतीयांकडून लढायचे. तेथूनच त्यांच्या विचारधारेला प्रोत्साहन मिळाले. महात्मा गांधी यांचे वास्तव्य साऊथ आफ्रिकेमध्ये २० वर्षापर्यंत राहिले. व त्यांनी १९१५ मध्ये भारतात परत जायचं निर्णय घेतला व भारतात आले होते. आल्यानंतर लगेचच त्यांनी भारतात चालू असलेल्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला

भारतात महात्मा गांधीजिंनी ब्रिटिश राजवटी विरोधात अनेक मोहीम सुरू केल्या ज्यात१९२० मध्ये, असहकार चळवळ केली  त्यामध्ये त्यांनी ब्रिटिश वस्तूंचा बहिष्कार केला होता व स्वदेशी वस्तु वापरण्याचे आवाहन केले . १९३० मध्ये दांडी यात्रा, सुमारे ३९० किलो मीटर चालून ही आंदोलन करण्यात आले होते. १९४२ भारत छोडो आंदोलन यामध्ये ब्रिटिशांनी भारतातून निघून मायदेशी जावे यासाठी आंदोलन केले होते,

३० जानेवारी १९४८ मध्ये महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे याने गोळ्या झाडून हत्या केली

महान राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्या आणि कोटी कोटी प्रणाम! Happy Gandhi Jayanti!

गांधीजींचे विचार

महात्मा गांधीजी यांच्या जयंती निमित्त त्यांच्या कर्तृत्वाला उजाळा देण्याबरोबरच त्यांचा आदर्श कायम ठेवण्याचा संकल्प केला जातो. महात्मा गांधीजी यांच्या शांती आणि अहिंसा या विचारांची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांचे विचार जगाला दिशा देणारे आहेत.

  1. एखादा देश आणि त्याची नैतिक मूल्ये किती महान आहेत, ही तिथल्या प्राण्यांना काशी वागणूक देतात त्यावरूनही कळून येते.
  2. आम्ही यांचा स्वाभिमान कुणाला दिलाच नाही, तर कुणी तो हिसकावून ही घेऊ शकणार नाही.
  3. देवाला कोणताच धर्म नसतो.
  4. अहिंसा ही दुर्बलांचे नाही तर बलवानांचे शस्त्र आहे.
  5. माझ्यातल्या उणीवा माझ अपयश हे माझ यश आणि माझ्या बुद्धिमत्तेसारखच  देवाकडून मिळालं आहे मी या दोन्ही गोष्टी देवाच्या पायी वाहतो.
  6. चुका करण्याचे स्वातंत्र्य समाविष्ट नअसेल तर ते स्वातंत्र्य निरर्थक आहे.
  7. मृत्यूशय्ये वरही खरी अहिंसा हसत राहील. अहिंसा ही एकमेव शक्ति आहे ज्याद्वारे आपण शत्रूला ही मित्र बनवू शकतो आणि त्याला प्रेम करण्यास भाग पाडू शकतो.
  8. जो पर्यन्त आपण पूर्ण पणे स्वातंत्र्य होत नाही तो पर्यन्त आपण परावलंबी राहू.
  9. भीती हा शरीराचा आजार नसून तो आत्म्याला मरतो.
  10. इतरांना मदत करणे हा आपल्या जीवनाचा उद्देश्य आहे.
  11. प्रामाणिक मतभेद हे सामन्यात: प्रगतीचे निरोगी लक्षणे असतात.
  12. तुम्ही जे करता ते कमी महत्वाचे असू शकते , परंतु सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही काहीतरी करता.
  13. मूलभूत फरक गुंतलेले असताना बहुतेक लोकांचे सिद्धांत काम करत नाहीत
  14. तुम्हाला उद्या  मरायचे आहे असे जगा आणि तुम्हाला कायमचे जगायचे आहे असे समजून शिका.
  15. गीता आपल्याला शिकवते की आपण आपल्या दैनंदिन जीवनात जे पाळत नाही त्याला धर्म म्हणता येणार नाही
  16. स्त्री ही जीवनातील सर्व पवित्र आणि धार्मिक वारश्याची मुख्य संरक्षक आहे.
  17. सत्य आणि अहिंसा हाच माझा धर्म आहे.
  18. सत्य माझा देव आहे आणि अहिंसा त्या देवाची आराधना आहे
  19. आधी ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील, नंतर तुमच्यावर ते हसतील, नंतर भांडतीलही पण सरते शेवटी विजय तुमचाच असेल.

 

Spread the love
Exit mobile version