महाराष्ट्रातील विद्यार्थी व पालकांसाठी आनंदाची बातमी. मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रातील पालकांचा कल हा सीबीएसई पॅटर्न असणाऱ्या शाळांकडे आहे, त्यामूळे राज्यातील राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये प्रवेश कमी होत आहेत. सर्वसामान्य विद्यार्थी व पालकांना सीबीएसई पॅटर्न चे शिक्षण तेवढे परवडणारे नाही, तरी सुद्धा पालक आपल्या पाल्यांना चांगले शिक्षण मिळावे या करीता सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये घालत आहेत. परंतु आत्ता काळजी करण्याची आवश्यकता नाही.
नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत, शालेय शिक्षण शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी महाराष्ट्रातील शाळांमध्ये CBSE पॅटर्न लागू करण्यासंबंधी एक मोठी घोषणा केली आहे. राज्य सरकारच्या शाळांमध्ये सुद्धा मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे व स्पर्धा परीक्षांमध्ये मुले मागे पडू नयेत यामुळे राज्य सरकारच्या शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न शिकवला जाणार आहे. केसरकर यांनी सांगितले की, शिक्षक संघटनांशी चर्चा करून या बदलांची अंमलबजावणी कशी करता येईल, यावर विचारविनिमय होईल. विद्यार्थ्यांना अधिक सुसंगत आणि शिस्तबद्ध शिक्षण पद्धती मिळावी यासाठी ही पावले उचलली जात आहेत. त्यात शाळांचे शैक्षणिक वेळापत्रक, परीक्षा कालावधी, आणि सुट्ट्या यांचा विचार केला जाणार आहे.
केसरकर यांनी याबाबत स्पष्ट केले आहे की हा निर्णय विद्यार्थ्यांच्या दीर्घकालीन शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, आणि त्यामुळे CBSE अभ्यासक्रमाचा विस्तार महाराष्ट्राच्या विविध भागांत होईल.