खाद्य तेलाच्या आयात शुल्कात वाढ: महागाईचा तडाखा

नवी दिल्ली : देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. खाद्यतेलाच्या आयात शूलकात 20% वाढ केली, परिणामी भारतीय बाजारपेठेत खाद्यतेलाच्या किंमतीं मध्ये वाढ  होऊ शकते.मध्यंतरीच्या काळात खाद्यतेलाच्या तुटवड्यामुळे खाद्यतेलाच्या आयात शूलकात घट करण्यात आली होती.

आयात शुल्कात वाढ केल्यामुळे तेल उत्पादकानसाठी  प्रोत्साहन मिळेल, जे देशातील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. ज्यामुळे तेलबियांचे दरही वाढू शकतात. महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होईल. परंतु सर्वसामान्य माणसाला याचा मोठा फटका बसणार आहे खाद्यतेलाच्या दरात 20-25 रुपयांनी वाढ झाली आहे. ऐण गणेशउत्सवा मध्ये खाद्यतेलाचे दर वाढल्याने सर्वसामान्यांन मध्ये तीव्र नाराजी बघायला मिळत आहे.

भारतात मोठ्या प्रमाणात खाद्य तेलाची आयात होते, ज्यात सोयाबीन, पाम तेल, आणि सूर्यफूल तेल यांचा समावेश आहे.  सर्व खाद्यतेलांवरील प्रभावी शुल्क हा ३५. ७५% वर जाणार आहे. क्रूड पाल्म ऑइल, क्रूड सोयाबीन ऑइल, आणि क्रूड सुनफ्लोवर सिड ऑइलवरील प्रभावी शुल्क ५.५% नि वाढला असून आता तो २७.५% होणार आहे. रिफाइंड सुनफ्लोवर सिड ऑइल, रिफाइंड पाल्म ऑइल आणि रिफाइंड सोयाबीन तेला वरील शुल्क १३.७५% हून ३५.७५% होणार आहे.     त्यामुळे खाद्यतेलांचे दर महागणार आहेत.

 

 

Leave a Comment