महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुका नोव्हेंबर मध्ये

मुंबई:  राज्यातील आगामी विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबेर च्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे, दोन टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकीसाठी आचारसंहिता दसऱ्यानंतर  लागू होईल , असे भाकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केले. पुढील काही दिवसांमध्ये  सत्ताधारी मित्रपक्ष्यांमध्ये जगावाटपांचा निर्णय होईल असेही मुख्यमंत्री यांनी सांगितले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर झालेल्या चर्चेत मध्यमांशी बोलताना विधान केले आहे. एकूण जागांची संख्या पाहता विधानसभेच्या निवडणूक दोन टप्प्यात घेणे योग्य राहील असे सांगतानाच, महायुती सरकार विकास आणि कल्याणकारी योजनांवर भर देत असून त्याला जनतेचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे असे ते म्हणाले, निवडणुकीसाठी महायुती सज्ज असून लोकसभा निवडणुकीतील यश आणि जिंकण्याची क्षमता या दोन निकषांवर महायुतिचे जगावाटप होत असल्याचे ते म्हणाले, या निकषाच्या आधारे ८-१० दिवसांमध्ये जगावाटप निश्चित केले जाईल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Leave a Comment