Scholarship : महाराष्ट्र सरकारच्या टॉप 5 स्कॉलरशिप योजना
1) महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शुल्क परतावा शिष्यवृत्ती योजना 2024/25
पात्र विद्यार्थी पदवी:
– बॅचलर
– मास्टर्स
– वैद्यकीय (MBBS/ MD)
सहाय्याचा प्रकार:
– निधी (partial funding)
पात्र अभ्यासक्रम
– वैद्यकीय (medicine)
अर्ज करण्याची अंतिम तारीख
– 31 मार्च 2025
पात्र राष्ट्रीयत्व
– भारतीय नागरिकांसाठी
शिक्षण फी परतावा योजना ओपन कॅटेगिरीतील विद्यार्थ्यांसाठी, महाराष्ट्र 2024/25 ही MBBS, BDS, आणि पदव्युत्तर वैद्यकीय (MD/MS) पदव्या घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी वित्तीय सहाय्य देण्यासाठी राबवली जात आहे. या योजनेतून विद्यार्थ्यांना संस्थेच्या FRA-मंजूर खर्चाची परतफेड पात्र विद्यार्थ्यांना केली जाईल..
पात्रता:
– विद्यार्थी हा खुल्या प्रवर्गातील असावा.
– विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
– विद्यार्थ्यांनी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे (cap) प्रवेश घेतला असावा.
– विद्यार्थ्यांनी खासगी अनुदानित महाविद्यालयांमध्ये MBBS, BDS, आणि पदव्युत्तर वैद्यकीय (MD/MS) अभ्यासक्रम घेतला असावा.
अर्ज प्रक्रिया:
– विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे:
– आधार कार्ड
– निवासी प्रमाणपत्र
– HSC आणि SSC गुणपत्रिका (नवीन अर्जदारांसाठी)
– मागील वर्षाची गुणपत्रिका
– विद्यार्थ्याचे PAN card (optional)
– पालकाचे PAN card कार्ड (optional)
2) EBC विद्यार्थ्यांसाठी Merit शिष्यवृत्ती, महाराष्ट्र 2024/25 (Merit Scholarships for EBC Students)
पात्रताधारक पदवी:
– हाय/सेकंडरी स्कूल
सहाय्याचा प्रकार:
– निधी (Partial Funding)
पात्रताधारक अभ्यासक्रम:
– संस्थांद्वारे दिले जाणारे निवडक विषय
अर्ज करण्याची अंतिम तारीख:
– 31 मार्च 2025
पात्रताधारक राष्ट्रीयत्व:
– भारतीय नागरिकांसाठी
ही शिष्यवृत्ती योजना महाराष्ट्रातील EBC (आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग) विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीद्वारे आर्थिक सहाय्य दिले जाते.
ईबीसी विद्यार्थ्यांसाठी merit शिष्यवृत्ती, महाराष्ट्र 2024/25, या योजनेंतर्गत 11वी किंवा 12वी वर्गातील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वित्तीय सहाय्य दिले जाते. या शिष्यवृत्तीद्वारे उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत करण्यात येते. या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना 10 महिन्यांसाठी दरमहा 160 रुपये मिळतील.
पात्रता:
– विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
– विद्यार्थ्याी हा आर्थिक दृष्ट्या मागास वर्ग (EBC) श्रेणीमध्ये असावा.
– विद्यार्थ्यांनी 11वी किंवा 12वीत शिक्षण घेतले पाहिजे.
– विद्यार्थ्यांनी SSC परीक्षेत पहिल्या प्रयत्नात 50% गुण प्राप्त केले असावे.
अर्ज प्रक्रिया:
– विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे:
– तहसीलदारांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र
– SSC गुणपत्रिका
– मागील वर्षाची गुणपत्रिका
लाभ:
– या स्कॉलरशिप द्वारे वासतिगृहत राहणाऱ्या विद्यार्थ्यांना 10 महिन्यांसाठी दरमहा 140 रुपये मिळतील.
आणि नॉन-होस्टेलर जसे की भाड्याच्या रूममध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना 10 महिन्यांसाठी दरमहा 80 रुपये मिळतील.
– वासतिगृहतील विद्यार्थ्यीनिं साठी 10 महिन्यांसाठी दरमहा 160 रुपये मिळतील.
– नॉन-होस्टेलर विद्यार्थ्यीनिंना 10 महिन्यांसाठी दरमहा 100 रुपये मिळतील.
3) राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ताधारित शिष्यवृत्ती, महाराष्ट्र 2024/25 (Rajarshri Chhatrapati Shahu Maharaj Merit Scholarship)
पात्रताधारक पदवी:
– हाय/सेकंडरी स्कूल
सहाय्याचा प्रकार:
– निधी (Partial Funding)
पात्रताधारक अभ्यासक्रम:
– संस्थांद्वारे दिले जाणारे निवडक विषय
अर्ज करण्याची अंतिम तारीख:
– 31 मार्च 2025
पात्रताधारकाचे राष्ट्रीयत्व:
– भारतीय नागरिकांसाठी खुला
ही शिष्यवृत्ती योजना महाराष्ट्रातील गुणवत्ताधारक हाय/सेकंडरी स्कूल विद्यार्थ्यांसाठी आहे. निवडक विषयांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करते.
राजर्ष्री छत्रपती शाहू महाराज गुणात्मक शिष्यवृत्ती, महाराष्ट्र 2024/25 ही शिष्यवृत्ती वर्ग 11 आणि 12 मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जाती (SC) विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना 10 महिन्यांसाठी दरमहा 300 रुपये दिले जातात.
पात्रता:-
– विद्यार्थ्यांनी हा महाराष्ट्राचा निवासी असने गरजेचे आहे.
– पात्र विद्यार्थ्यी हा अनुसूचित जाती (SC) कॅटेगिरी मध्ये असावा.
– विद्यार्थ्यांनी 11वी आणि 12वीत शिक्षण घेणारा असावा.
– पात्र विद्यार्थ्याला 10वीत 75% किंवा अधिक गुण असावेत.
अर्ज प्रक्रिया:
– विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे:
– जात प्रमाणपत्र
– 10वी ची गुणपत्रिका
– शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
– 11वीत प्रवेश घेतल्याबद्दलची पावती
लाभ:
– 75% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवलेल्या SC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 11वीत प्रवेश घेतल्यास 10 महिन्यांसाठी दरमहा 300 रुपये या स्कॉलरशिप द्वार मिळतील
4) DTE राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना (EBC) विद्यार्थ्यांसाठी, महाराष्ट्र 2024/25
पात्रताधारक पदवी:
– बॅचलर
– मास्टर्स
– डिप्लोमा
– MBA
– वैद्यकीय (MBBS/ MD)
सहाय्याचा प्रकार:
– निधी (Partial Funding) शिक्षण शुल्काचा 50% + परीक्षा शुल्काचा 50%
पात्रताधारक अभ्यासक्रम:
– सर्व विषय
अर्ज करण्याची अंतिम तारीख:
– 31 मार्च 2025
पात्रताधारक राष्ट्रीयत्व:
– भारतीय नागरिकांसाठी खुला
ही शिष्यवृत्ती योजना आर्थिक दृष्ट्या मागास वर्ग (EBC) गटातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. पात्र विद्यार्थ्यांना सर्व विषयांमध्ये शिक्षण शुल्कात आर्थिक सहाय्य दिले जाते.
डीटीई राजर्षि छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना (EBC) विद्यार्थ्यांसाठी, महाराष्ट्र 2024/25, ही शिष्यवृत्ती बॅचलर, मास्टर, डिप्लोमा, MBA, आणि वैद्यकीय (MBBS/MD) पदव्या घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. या योजनेचा उद्देश आर्थिक दृष्ट्या मागास वर्ग (EBC) विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळवण्यात मदत करणे आहे. निवडलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्काचा 50% आणि परीक्षा शुल्काचा 50% मिळेल.
पात्रता:
– विद्यार्थ्यी हा भारतीय नागरिक असावा.
– विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचा निवासी असावा.
– विद्यार्थ्यांनी व्यावसायिक आणि तांत्रिक अभ्यासक्रम (डिप्लोमा/पदवी/पदव्युत्तर) मध्ये प्रवेश घेतला असावा.
– विद्यार्थ्यांना केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे (CAP) सामान्य श्रेणी आणि EBC श्रेणी अंतर्गत प्रवेश घेणे आवश्यक आहे.
– विद्यार्थ्यांनी मागील सेमेस्टरमध्ये किमान 50% उपस्थिती असावी (नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना वगळून).
– विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयां पेक्षा कमी असावे.
अर्ज प्रक्रिया:
– विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे:
– 10वी (SSC) आणि त्यानंतरच्या सर्व गुणपत्रिका
– महाराष्ट्राचे डोमसाईल प्रमाणपत्र
– कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र
– CAP संबंधित कागदपत्र
– बायोमेट्रिक उपस्थितीचे पुरावे (Interface UIDAI)
– सध्याच्या वर्षात कुटुंबातील दोन व्यक्तींपेक्षा अधिक योजनेचा लाभ घेत नाहीत याबाबतची हमी पत्रिका
लाभ:
– विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्काचा 50% आणि परीक्षा शुल्काचा 50% मिळेल.
5) एकलव्य शिष्यवृत्ती योजना, महाराष्ट्र 2024/25
पात्रताधारक पदवी:
– मास्टर्स
सहाय्याचा प्रकार:
– निधी (Partial Funding) एकत्रितपणे 5000 रुपये मिळतील.
पात्रताधारक अभ्यासक्रम:
– कायदा (Law)
– कला (Arts)
– वाणिज्य (Commerce)
– विज्ञान (Science)
अर्ज करण्याची अंतिम तारीख:
– 31 मार्च 2025
पात्रताधारक राष्ट्रीयत्व:
– भारतीय नागरिकांसाठी
एकलव्य शिष्यवृत्ती, महाराष्ट्र 2024/25, ही शिष्यवृत्ती विधी, कला, वाणिज्य, आणि विज्ञान क्षेत्रातील पदव्युत्तर (Masters) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. या शिष्यवृत्तीत निवडलेल्या विद्यार्थ्यांना एकत्रितपणे 5000 रुपये मिळतील.
पात्रता:-
– विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचे निवासी असावे.
– विद्यार्थ्यांनी LAW, वाणिज्य, आणि कला शाखांमध्ये 60% किंवा त्यापेक्षा अधिक गुण, आणि विज्ञान शाखेत 70% किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केलेले असावे, जे महाराष्ट्रातील मान्यता प्राप्त संस्थेत/विद्यालयात असावे.
– विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 75,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी असावे.
– विद्यार्थ्यांने कोणत्याही ठिकाणी Part-Time किंवा Full Time नोकरी करू नये.
अर्ज प्रक्रिया:
– विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे:
– तहसीलदाराचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र
– मागील परीक्षेची गुणपत्रिका
– निवासी प्रमाणपत्र
लाभ:
– निवडलेल्या विद्यार्थ्यांना 5000 रुपये मिळतील, जे गुणवत्तेच्या आधारे देण्यात येतील.
– महाराष्ट्राबाहेर शिकणारे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र नाहीत.
सूचना :- तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास किंवा अर्ज कसा करायचा याबद्दल अधिक माहिती पाहिजे असल्यास, कृपया संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.