Money Management : पैश्यांचे व्यवस्थापन असे करा म्हणजे पैसा टिकून राहील.

Money Management

Money Management :

आपल्या आयुष्यात पैश्यांचे नियोजन करणे हा एक महत्वाचा भाग असतो. चांगल्या आर्थिक नियोजनाणे आपण आर्थिक स्थिरता मिळवू शकतो आणि भविष्याची पूर्व तयारी ही करू शकतो. पैसे जेवढे कमावणे सोपे आहे तेवढेच टिकवणे जरा जड जाते. Money Management म्हणजे आणखी काही नसून तुमच्या खर्चांवर नियंत्रण ठेवणे व त्या गोष्टींचे पुनरवलोकण करणे त्यामूळे आर्थिक स्थिरता निर्माण होते. त्याबद्दलच आपण येथे काही टिप्स जाणून घेणार आहोत

बजेट तयार करा:

 

आपल्या उत्पन्नाचे आणि खर्चाचे निरीक्षण करणे ही एक मुख्य पायरी आहे, तुमची उत्पन्न, लाइफस्टाईल आणि तुमच्या ईच्छा यांच्या वर आधारित तुम्हाला प्रत्येक महिन्याला किती पैसे लागतील याचा अंदाज लावा जसे की घरभाडे, वीज बिल, किरणा, आणि आवाहतुक खर्च यांचे नियोजन करा त्यानंतर चैनीच्या गोष्टींकडे जसे सिनेमा बघणे किंवा फिरायला जाणे यासाठी एक वेगळे नियोजन करा यावरून तुम्हाला लक्ष्यात येईल की कुठे खर्च करायचा आणि कुठे बचत करायची या पूर्ण नियोजननंतर उरलेली रक्कम बचत किंवा गुंतवणुकीसाठी वापरा

बचतीची सवय लावा:

 

पैश्यांची बचत करणे ही गोष्ट तुम्हाला येणाऱ्या काळात  खूप मोठ्या आर्थिक संकटापासून वाचवू शकते. भविष्यातील गरजांसाठी उपयुक्त ठरते. प्रत्येक महिन्याच्या उत्पन्नातील किमान 20% रक्कम ही वेग वेगळ्या ठिकाणी बचत खात्यांमध्ये ठेवा किंवा गुंतवणूक करण्यासाठी वेगळी  ठेवा ,एखाद्या योजनेत टाका नाही तर SIP (systematic Investing Plan) मध्ये नियमित गुंतवणूक करा. आवश्यक आणि अनावश्यक खर्च ओळखा आणि त्यानुसार बचत करा.

गुंतवणूक करा:

 

 

बचत केली म्हणजे तुमचे तुमचे काम जल असं नाही , फक्त बचतीमुळेच तुम्हाला परतावा मिळनार नाही त्यासाठी तुमचे पैसे गुंतवणूक करणं महत्वाच आहे. योग्य ठिकाणी गुंतवणूक करून योग्य परतावा मिळू शकतो त्यासाठी तुमच्या रिस्क नूसार तुमची गुंतवणूक ही शेअर मार्केट मध्ये, म्यूचुअल फंड्ज, गोल्ड, स्थावर मालमत्ता  किंवा इतर काही मार्ग या मध्ये करू शकता, त्यामूळे तुमची संपत्ति वाढेल. गुंतवणुकीपूर्वी सर्व जोखीमांचा अभ्यास करा आणि गुंतवणूक करा

आपत्कालीन निधी तयार करा:

 

जीवनात कोणत्याही क्षणी आपल्याला माहिती नसलेल्या गोष्टी घडू शकतात अपघात, आजारपण,किंवा नोकरी गामावण्यासारख्या आपत्कालीन स्थिति उद्भवू शकतात त्या गोष्टींना सामोरे जाण्यासाठी आपत्कालीन निधी तयार करणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला व तुमच्या कुटुंबातील सदस्यांचा टर्म इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, आणि गंभीर आजारातील विमा या विमा योजना तुम्हाला आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत करतात.

कर्ज टाळा किंवा नियंत्रित ठेवा :

जीवनात प्रत्येक क्षण हा सारखा नसतो कधी सु:ख कधी दु:ख असते, जीवनात पुढे जाण्यासाठी कर्ज घ्यावे लागते परंतु जास्त कर्ज घेणे तुम्हाला आर्थिक अडचणीत टाकू शकते कर्जाच्या उच्च व्याजदरांमुळे आपण विळख्यात सापडतो, आवश्यक असेल तरच कर्ज घ्या आणि तीची वेळेत परतफेड करा क्रेडिट कार्ड चा  वापर हा खूप मर्यादित ठेवा आणि जास्त व्याजदर असलेले कर्ज ताळा कर्ज जेवढे चंगळे आहे तितकेच वाईटही असतात. त्यामूळे कर्ज मर्यादेत असलेलं कधीही चांगल.

Financial Goal सेट करा:

Financial Goal करणे तुम्हाला नेहमीच्या खर्चावर आणि बचतीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते, जीवनातील छोट्या मोठ्या उद्दिष्टांसाठी जसे की तुमचे घर, तुमच्या मुलांचे शिक्षण, रीटायरमेन्ट, तुमची आवडती कार अश्या आर्थिक उद्दिष्ट सध्या करण्यासाठी तुम्ही पैसे गुंतवून ठेवले पाहिजे. Financial Goal सेट करताना वेळ आणि पैश्यांचे नियोजन नेटके केले पाहिजे. ते तुम्हाला मोतीवते राहण्यास मदत करतात

वित्तीय साधनांचा वापर करा:

आत्ताच्या काळात वित्तीय साधने मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत ज्याचा वापर करून आपण  आपल्या पैशयांचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करू शकतो. बँकिंग अॅप्लिकेशन्स, बजेटिंग टूल, इणवेस्टमेंट टूल, लोन कॅल्कुलेटर्स, टॅक्स प्लॅनिंग टूल्स, सेविंग टूल्स आणि असे बरेच वित्तीय साधने आहेत ज्यांचा वापर करून तुम्ही मनी मॅनेजमेंट करू शकता.

विमा घ्या :

विमा घेणं ही आर्थिक सुरक्षा आणि संरक्षनासाठी अत्यावश्यक आहे, विशेष म्हणजे आरोग्यविमा आणि जीवनविमा ही तुमच्या कुटुंबासाठी महत्वाचे आहेत विमा घेतल्याने आकस्मित (emergency) खर्चाचा भार पडत नाही. अचानक कुटुंबातील एखादा माणूस आजारी पडल्याने त्याला लागणारा खर्च आरोग्य विमा भरून काढू शकतो,त्यामूळे आर्थिक नियोजनासाठी आरोग्य विमा घ्यायलाच हवा, आणि जीवनविमा हा तुमच्या कुटुंबातील आर्थिक आधार असतो, तुमचे किंवा एखाद्या सदस्याचे अकाली निधनानंतर तुमच्या कुटुंबाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो, जर कुटुंबातील सर्व सदस्यांचा जीवंनविमा असेल तर त्या संकटांवर मत करता येते.

कर नियोजन करा:

कर भरणे हे प्रत्येकाची जबाबदारी आहे, परंतु त्याचे योग्य नियोजन केल्यास तुम्ही कर वाचवू शकता आणि त्यामूळे अधिक बचत ही करू शकता. कर वाचवण्यासाठी 80C अंतर्गत उपलब्ध असलेल्या विविध गुंतवणुकीच्या योजनांचा फायदा घेता येईल, जसे की PPF, EPF, आणि  इतर कर सवलत योजनांमद्धे गुंतवणूक करून कर कमी करू शकता.

कर परतावा: कर परतावा मिळवण्यासाठी  कर भरावा लागतो त्यामूळे योग्य वेळी कर भरल्याने कर परतावा मिळतो आणि अधिक बचत होते त्यामूळे टॅक्स फाइलिंग प्रक्रिया समजून घ्या

वरील पद्धतीनुसार पैश्यांचे नियोजन केले तर सर्वांचे पैसे वाचतील, बचत आणि गुंतवणूक करण्यास मदत होईल. योग्य रीतीने पैश्यांचे नियोजन केल्याने जीवं सुलभ व सुखद होते. त्यामूळे सर्वानी आपल्या पद्धतीने नियोजन करायला हवे.

Leave a Comment