navratri 2024:
जगामध्ये आदिमायशक्तीची १०८ पिठे आहेत त्यातील देशात देवीची ५१ शक्तिपीठ आहेत तर त्यापैकी महाराष्ट्रात साडेतीन शक्तिपीठ आहेत.
आपल्या महाराष्ट्रातील आदिमायशक्तीची साडे तीन पिठे ही महत्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी एक आहेत. या साडेतीन शक्ति पीठांना देवीची उपासना करण्यासाठी विशेष मान्यता आहे आणि या स्थानांना धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व आहे. तुळजापूर, कोल्हापूर, माहुरगड व वणी येथे नवरात्र उत्सवात शक्तिपीठांना फार गर्दी असते भाविक आपल्या मनोकामना घेऊन दर्शनासाठी येत असतात. त्यांच्या मनोकामनाही पूर्ण होतात तर जाणून घेऊयात साडे तीन शक्तिपीठां विषयी विशेष माहिती.
तुळजाभवानी (तुळजापूर, धाराशिव)
मंदाकिनि नदीकाठी तप करत असताना अनुभूति वर कूक्कर राक्षसाने हल्ला केला तेंव्हा तिने जगदंबेला हाक मारली. देवी लगेच प्रकट होऊन तिने कूक्कर रक्षसाचे प्राण घेतले. असुरांचा संहार करूण देविने धर्माची पुनरस्थापना केली. देवी त्वरित आल्याने तिला त्वरिता असे म्हणू लागले व पुढे चालून त्याचा अपभ्रंश तुरजा आणि पुढे तुळजा असा झाला.
आई तुळजा भावनीला महराष्ट्राची कुलस्वामिनी म्हटले जाते तुळजाभवनीचे तीर्थक्षेत्र हे एक पूर्ण आणि आद्य शक्तिपीठ आहे. आई तुळजा भवानी चे मंदिर हे साधारणत: १२ व्या शतकात बांधले गेले. मंदिराचा काही भाग हेमाडपंती शैलीमध्ये आहे. मंदिर हे डोंगराच्या टोकावर असून या मंदिराचे शिखर व कळस दिसत नाही. आई तुळजा भवानी ही हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची कुलदेवी होती. छत्रपती शिवाजी महाराज ही तुळजा आई तुळजा भवानी चे निस्सीम भक्त होते त्यांच्या तलवारीचे नाव भवानी होते ते सुद्धा आई तुळजा भवानी वरूनच ठेवण्यात आले होते. आणि अशी आख्यायिका आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांना आई तुळजा भवानीने साक्षात्कार करून तलवार दिली होती. नवरात्र उत्सवात येथे लाखों भाविक येतात व शौर्य, यशा साठी प्रार्थना करतात.
महालक्ष्मी अंबाबाई (कोल्हापूर)
ब्रह्म देवाचा मानसपुत्र असलेला कोल्हासूर त्याला चार मुले होती करवीर, विशाल, कुलंधक आणि लज्जासुर. कोल्हासूर त्याचे राज्य मुलांच्या स्वाधीन करून तो वनात गेला त्याने संन्यास घेतला. इकडे त्याच्या चार मुलांनी लोकांना खूप छळायला सुरुवात केली. तेंव्हा भगवान शंकराने रागात येवून करवीराचा वध केला. भगवान विष्णुंनी विशाळसुरचा वध केला, ब्रह्मदेवाने लाज्जासुरचा वध केला व कुळकंधा चा इंद्रानी वध केला
या गोष्टीने कोल्हासूर खूप चिडला व सर्वांना त्रास देवू लागला. लोकांनी जगदंबे चरणी प्रार्थना केली व धावा केला. देवी त्वरित प्रकट झाली व तिने आश्विन शुद्ध पंचमिला कोल्हासूरचा वध केला. पन कोल्हासूराने मृत्यूपूर्वी देवीकडे एक वरदान मागितले मला देवीच्या १८ हातांनी मारावे व देवीच्या नावाबरोबरच माझे व माझ्या मुलाचे नाव लावण्यात यावे. म्हनुनच आपण करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई असे म्हणतो.
कोल्हापुरातील महालक्ष्मी अंबाबाई मंदिराचे बांधकाम सुमारे सातव्या किंवा आठव्या शतकात केले असावे . छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात मॅा जिजाऊसाहेब यांच्या संकल्पनेने मंदिराची पुनर्बांधणी केली गेली. मंदिराची वास्तूकला भव्य व प्राचीन आहे. मंदिरात आई अंबाबाई च्या समोरील बाजूस गरुड मंडप आहे व त्यात गरुड स्थित आहे. मंदिराच्या मुख्य गभर्यात आई अंबाबाई ची मूर्ती आहे व ती कळ्या दगडापासून घडलेली आहे. येथे शारदीय नवरात्र उत्सव असतो, शारदीय नवरात्र उत्सवात भाविकांची गर्दी जमते.
रेणुका माता माहुरगड (नांदेड)
कार्तवीर्य राजाने ऋषि जमदग्नि कडे गाय कामधेनूची मागणी केली परंतु जमदग्निंनी कामधेनु राजाला दिली नाही, त्यामूळे राजाने जमदग्निचा वध केला. जमदग्नि यांचा पुत्र परशुराम याने कार्तवीर्य राजाचा वध केला व त्याबरोबरच २१ वेळा पृथ्वी निक्षत्रीय केली. त्याच परशुरामाने पितृ आदेशावरून आपल्या आईचा म्हणजे माता रेणुकेचा वध केला परंतु परशुरामाला पुनः आपल्या आईची आठवण येत असल्याने दुखी झाला त्याच क्षणी एक आकाशवाणी झाली तुझी आई तुला परत मिळेल परंतु तू मागे वळून बघू नकोस, परशुरामाला संयम आवरला नाही आणि त्याने मागे वळून बघितले. परशुरामाने मागे वळून बघितल्यामुळे त्याला फक्त मुखाचे तेवढेच दर्शन झाले. हीच ती माहुरगडची रेणुका माता.
महुरगड हे महराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. मंदिर अत्यंत प्राचीन असून उंच डोंगरावर वसलेले आहे व त्याला मातापूर असे म्हटले जायचे पुढे चालून त्याचा अपभ्रंश माहुर असा झाला. मंदिराचे बांधकाम हे यादवकलीन आहे.
माहुरगडावर श्री भगवान दत्तात्रय यांचे निजस्थान आहे, तसेच अनुसया माता यांचे मंदिर ही आहे.
सप्तशृंगी (वणी,नाशिक)
महिषासूरा हा एक बलाढ्य राक्षस त्याने देव देवतांना खूप त्रस्त करून सोडले होते. महिषासूराचा वध करण्यासाठी सर्व देवी देवतांनी आव्हान केले व देवीची प्रार्थना केली व देवी, मार्कंडेय ऋषिंणी केलेल्या होमातून प्रकट झाली. आणि महिषासुराचा वध केला. तिचे हेच रूप म्हणजे आई सप्तशृंगी होय तिला महिषासुर मर्दिनी असे ही म्हणतात. आईने महिषसूरचा वाढ याच सप्तशृंगगडावर केला. पुराणानुसार आई सप्तशृंगी ब्रह्मदेवाच्या कमंडलातून प्रकटलेल्या गिरिजा महानदीचे रूप आहे त्यामूळे आई सप्तशृंगीला ब्रह्मस्वरूपिणी असेही म्हणतात.
आई सप्तशृंगी हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्ति पीठांपैकी अर्ध शक्ति पीठ मानल जातं. आई सप्तशृंगीचे वास्तव्य हे सप्तशृंगगडावर आहे. मंदिरात आसनावर असलेली आई सप्तशृंगीची मूर्ती ही भव्य ९ फुट उंचीची आहे व १८ भुजा (हात) आहेत. १८ हातांमध्ये वेग वेगळे शस्त्र ही आहेत. आईची मूर्ती ही पाषाणापासून घडलेली आहे. नवरात्र उत्सवात येथे भाविकांची गर्दी असतेच परंतु चैत्र पौर्णिमेला देवीची यात्रा भरते.
अधिक माहितीसाठी यांच्यासोबत अपडेट रहा https://newsmarathi.in