महाराष्ट्रातिल सोयाबीन व कापूस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी, 2023 मध्ये, पावसाचे प्रमाण खूपच कमी झाल्याने आणि कापूस व सोयाबीनचे दर घसरल्यामुळे शेतकार्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. ही बाब लक्ष्यात घेऊन २०२३ खरीफ हंगाममधील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 26 सप्टेंबर पासून अनुदान वितरण सुरू होईल. अनुदान वितरणाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती राज्याचे कृषि मंत्री धनंजय मुंढे यांनी दिली.
मागील 2023 खरीफ हंगाममधील आर्थिक नुकसान झालेल्या कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 5 हजार रुपये प्रति हेक्टरच्या या प्रमाणे अर्थसहाय्य देण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता दिली आहे. मंत्रालयात झालेल्या कृषि विभागातील अधिकारी यांच्या सोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाद्वारे 91 लाख हेक्टर क्षेत्रावरील 83 लाख शेतकऱ्यांना एकूण 4192 कोटी रुपये अनुदान वितरित केले जाईल. अशी माहिती कृषि मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली
तसेच या वर्षी सोयाबिनचे उत्पन्न चांगले आहे या अपेक्षेने, शासनाने नाफेड आणि एनसीसीएफ यांसारखे सोयाबीन हमीभाव केंद्रे लवकरात- लवकर सुरू करण्याचेही आदेश दिले आहेत.