तिरुपती लाडू भेसळ प्रकरण: समोर येत आहेत धक्कादायक खुलासे

तिरुपती लाडू भेसळ प्रकरण: तिरुपती बालाजी मंदिरात दर दिवशी लाखोंच्या संख्येने भाविक व्यंकटेश्वरच्या दर्शनासाठी जात असतात. तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसाद म्हणजेच लाडू, हा भक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. व्यंकटेश्वरच्या दर्शनासाठी गेलेला प्रत्येक भाविक हा लाडू प्रसाद घेतोच. मात्र, काहीवेळा लाडूमध्ये भेसळ किंवा नकली लाडू विक्रीची बातमी समोर येते, ज्यामुळे भक्तांमध्ये अस्वस्थता निर्माण होते. पण आत्ता काही खळबळ जनक बातमी समोर आली आहे .

चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील आंध्र प्रदेश सरकारने जारी केलेल्या एका चाचणी अहवालानुसार, तिरुपती लाडू तयार करण्यासाठी शुद्ध तुपाऐवजी जनावरांची चरबी आणि माशांचे तेल वापरण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. हा अहवाल आल्यापासून वादाला तोंड फुटले आहे. आंध्र प्रदेशमध्ये वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांच्या सरकारच्या कार्यकाळात तिरुपती लाडू प्रसादाच्या शुद्धतेत भेसळ झाली आहे, आणि या पवित्र प्रसादाच्या बनवण्याच्या प्रक्रियेत प्राण्यांच्या चरबीचा वापर होत आहे. असे आरोप चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पार्टी कडून केले जात आहेत. या आरोपांना भारतीय जनता पार्टी ने देखील पाठिंबा दिला आहे. हे प्रकरण धार्मिक आणि राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील बनले आहे,

काही दिवसांपूर्वी तिरुपती लाडूच्या गुणवत्तेबद्दल आलेल्या तक्रारींनंतर, 9 जुलैला तिरुमला तिरुपती देवस्थानम् (TTD) ने लाडू तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपाचे नमुने तपासणीसाठी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड (NDDB) कडे पाठवले होते. या बोर्डाच्या (CALF) Centre for Analysis and Learning in Livestock and Food. ने तपासणी करून 17 जुलैला अहवाल सादर केला होता, ज्यात एका कंपनीच्या तुपात भेसळ असल्याचे निदर्शनास आले.

यानंतर, 23 जुलैला पुन्हा एकदा तपासणीसाठी तुपाचे नमुने पाठवण्यात आले होते. या तपासणीचा अंतिम अहवाल 18 सप्टेंबरला समोर आला. या अहवालानुसार, तुपाची गुणवत्ता निर्धारित स्टँडर्ड वॅल्यूच्या मर्यादेबाहेर असल्याचे आढळले आहे, तसेच या तुपामध्ये माशांचे तेल, जनावरांची चरबी, आणि डुकराची चरबी असल्याचे देखील नमूद करण्यात आले आहे.

लाडू बनवण्यासाठी लागणाऱ्या तुपाचे टेंडर केवळ ₹320 प्रति किलो च्या दराने काढण्यात आले होते, आणि या टेंडरमध्ये चार कंपन्यांना करार देण्यात आला होता. या कंपन्यांपैकी तमिळनाडूच्या AR डेअरी कडून पुरवल्या जाणाऱ्या तुपात भेसळ असल्याचे तपासणीत समोर आले आहे. या भेसळीत माशांचे तेल, प्राण्यांची चरबी, आणि डुकराची चरबी यांचा समावेश असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे, ज्यामुळे तिरुपती लाडूच्या शुद्धतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

बोर्डाच्या अध्यक्षपदी तत्कालीन सरकारकडून 2021 मध्ये वाय.व्ही. सुब्बा रेड्डी यांची दुसऱ्यांदा TTD बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. ते जगन मोहन रेड्डी यांचे मामा आहेत.

Leave a Comment