मुंबई: विदर्भातील संत्रा आणि मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई लवकरच मिळणार आहे. नुकत्याच मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत शासनाने हा निर्णय घेतला आहे. नुकसान भरपाईचा निधी सर्व प्रक्रिया पूर्ण करून तातडीने वितरित करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले आहेत.
संत्रा निर्यातीत मोठा दिलासा मॅग्नेट प्रकल्पांतर्गत संत्रा पिकासंबंधी कामांचाही या बैठकीत आढावा घेण्यात आला. विदर्भातील संत्रा उत्पादकांना मॅग्नेट प्रकल्पाच्या माध्यमातून अधिक लाभ मिळावा यासाठी या कामांना गती देण्याची सूचना करण्यात आली आहे.
तसेच, बांग्लादेशमध्ये निर्यात होणाऱ्या संत्र्यांकरिता मोठी घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने संत्र्याच्या निर्यातीवर लागणाऱ्या आयात शुल्कावर 50% अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात विदर्भातील संत्र्यांची मागणी वाढेल आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मोठा फायदा होईल.