मंदाकिनि नदीकाठी तप करत असताना अनुभूति वर कूक्कर राक्षसाने हल्ला केला तेंव्हा तिने जगदंबेला हाक मारली. देवी लगेच प्रकट होऊन तिने कूक्कर रक्षसाचे प्राण घेतले. असुरांचा संहार करूण देविने धर्माची पुनरस्थापना केली. देवी त्वरित आल्याने तिला त्वरिता असे म्हणू लागले व पुढे चालून त्याचा अपभ्रंश तुरजा आणि पुढे तुळजा असा झाला