दिल्जीत दोसांझ : एक पंजाबी सुपरस्टार ते बॉलिवूडचा सुपरहिट नं.1 अभिनेता

दिल्जीत दोसांझ: एक पंजाबी सुपरस्टार ते बॉलिवूडचा सुपरहिट अभिनेता

दिल्जीत दोसांझ

पंजाबचा प्रसिद्ध अभिनेता, गायक, आणि संपूर्ण देशात लोकप्रिय असलेला दिलजीत दोसांझ, केवळ त्याच्या गाण्यांसाठीच नव्हे तर अभिनयासाठी आणि त्याच्या अनोख्या व्यक्तिमत्वासाठीही प्रसिद्ध आहे. दिल्जीतची जीवनकहाणी अत्यंत प्रेरणादायी आहे, कारण त्याने केवळ पंजाबच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये आपली छाप सोडली आहे. दिलजीतने आपल्या म्युझिक आणि चित्रपट करिअरमधून अनेक माईलस्टोन गाठले आहेत, आणि त्याच्या प्रेमळ व्यक्तिमत्वामुळे तो प्रत्येक चाहत्याच्या मनात एक वेगळी जागा निर्माण करतो.

प्रारंभिक जीवन आणि करिअरची सुरुवात

दिल्जीत दोसांझचा जन्म पंजाबच्या दोसा नावाच्या एका छोट्या गावात झाला. अत्यंत मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेल्या दिल्जीतला लहानपणापासूनच संगीताची आवड होती. त्याने कधी कल्पनाही केली नव्हती की, त्याचे गाणे जगभरात पोहोचेल. दिलजीतचे शिक्षण अगदी साध्या शाळेत झाले आणि त्याचे बालपण देखील सामान्य मुलांसारखेच होते. मात्र, दिल्जीतची गायनाची आवड लकश्यात गहेवून त्याच्या वडिलांनी त्याला म्युझिक शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले, आणि यामुळे त्याला एक गायनाची नवी दिशा मिळाली.

दिल्जीतने त्याच्या करिअरची सुरुवात गुरुद्वाऱ्या मध्ये होणाऱ्या कीर्तनापासून केली. त्याचा आवाज ऐकून लोक त्याच्या आवाजाचे चाहते बनू लागले. यानंतर त्याने २००४ मध्ये “इश्क दा उडा आड़ा” हे पहिले म्युझिक अल्बम रिलीज केले, ज्याने त्याला पंजाबी संगीतसृष्टीत खूप प्रसिद्धी मिळाली.

पंजाबी चित्रपटसृष्टीतील कामगिरी

पंजाबी संगीत क्षेत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर दिल्जीतने पंजाबी चित्रपटसृष्टीतही पदार्पण केले. त्याचा पहिला चित्रपट *द जर्नी ऑफ पंजाब ३७०* होता, जो फ्लॉप ठरला. पण त्यानंतर त्याने *जट्ट अँड जूलियट* या चित्रपटामधून आपला ठसा उमटवला. हा चित्रपट पंजाबी चित्रपटसृष्टीत एक सुपरहिट ठरला आणि दिलजीतची ओळख एक रोमँटिक आणि कॉमिक अभिनेता म्हणून झाली.

जट्ट अँड जूलियट या चित्रपटाने दिलजीतला घराघरात पोहोचवले, पंजाबी प्रेक्षकांनी भर भरून प्रतिसाद दिला आणि त्यानंतर त्याने साडे मुण्डे कमाल दे, अंबरसरीया, उडता पंजाब, आणि सुपर सिंह यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. त्याच्या अभिनयानं पंजाबी चित्रपटसृष्टीला एक नवीन स्टार मिळाला. पंजाबी चित्रपटसृष्टीत दिल्जीतचा आजही एक विशेष संन्मान आणि महत्व आहे, कारण त्याने त्या सृष्टीत त्याच्या गाण्यांमुळे आणि चित्रपटांमुळे चाहत्यांवर अनोखी छाप सोडली आहे. पंजाब मधील अनेक कलाकारांच्या पुढे जाऊन त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.

बॉलिवूडमध्ये पदार्पण आणि प्रसिद्धी

पंजाबी फिल्म इंडस्ट्री मध्ये डंका वाजवून तो २०१६ मध्ये बॉलीवुड कडे वळला होता. शाहिद कपूर हीरो असलेल्या उडता पंजाब या चित्रपटाद्वारे दिल्जीतने बॉलीवुडमध्ये एंट्री मारली होती. यात त्याने एका साध्या पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली, आणि त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. प्रेक्षकांना त्याचा अभिनय खूप आवडला. पंजाबमधील ड्रग्सच्या समस्येवर आधारित या चित्रपटात दिलजीतने संवेदनशील भूमिका निभावली आणि त्याच्या अभिनयाची बॉलिवूडमध्येही खूप प्रशंसा झाली होती .

उडता पंजाबमधील यशानंतर दिल्जीतला बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांची ऑफर्स मिळाल्या. त्यानंतर त्याने फिल्लौरी, सूरमा, गुड न्यूज, आणि हौंसला रख यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. गुड न्यूज या चित्रपटात त्याने अक्षय कुमार, करीना कपूर, आणि कियारा अडवाणी यांसारख्या मोठ्या कलाकारांसोबत काम केले आणि त्याच्या कॉमिक टाइमिंगने त्याला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळवून दिली. दिल्जीतचे बॉलिवूडमधील काम हे यशस्वी ठरले आणि आज तो बॉलिवूडमधील एक मोठा नामांकित अभिनेता बनला आहे.

म्युझिकच्या माध्यमातून ग्लोबल ओळख

दिल्जीत फक्त अभिनयापुरता मर्यादित नसून एक अष्टपैलू आणि उत्तम गायक देखील आहे. त्याचे गाणे “प्रॉपर पटोला” आणि “डू यू नो” जगभरात प्रसिद्ध झाले आहेत. याशिवाय त्याने इंग्लिश गाणी गायली आहेत, ज्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील ओळख मिळाली आहे. त्याने आपली एक वेगळी शैली तयार केली आहे, ज्यात पारंपरिक पंजाबी संगीत आणि आधुनिक हिप-हॉपचा मिश्रण आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील गायक दिल्जीत सोबत येवून कोलॅब सुद्धा करतात आणि त्याच्या गाण्यांवर थीरकतात सुद्धा. दिल्जीतच्या गाण्यांना तरुणांमध्ये मोठी लोकप्रियता मिळाली आहे, आणि त्याच्या संगीतातील विविधता त्याचे खास वैशिष्ट्य आहे.
दिल्जीतचा जगप्रसिद्ध दिल लुमिनाटी हा कॉन्सर्ट चालू केल्या नंतर त्याच्या शो ला खूपच गर्दी होत आहे. त्याचे टिककेट्स काही तासांतच विकले जात आहेत. त्याच्या कॉन्सर्टसाठी बाहेर देशात सुद्धा टूर काढत आहे. त्याने आपल्या म्युझिक च्या माध्यमातून लोकांना मंत्रमुग्ध केले त्यामूळे प्रेक्षकही त्याला भर भरून प्रेम देत आहेत.

व्यक्तिमत्वाचे अनोखे पैलू

दिल्जीत दोसांझचे व्यक्तिमत्व त्याच्या अभिनय आणि गायनाच्या बाहेर देखील विशेष आहे. तो एक साधा आणि नम्र माणूस आहे, जो नेहमी आपल्या मातीशी जोडलेला असतो. त्याच्या चाहत्यांशी तो सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधतो आणि अनेकदा मजेशीर पद्धतीने उत्तर देतो. त्याची फॅशन सेन्स देखील चर्चा करण्या योग्य असते. दिलजीतने अनेकवेळा प्रसिद्ध ब्रँड्ससाठी मॉडेलिंग केले आहे, आणि तो नेहमीच आपल्या स्टाइलसाठी ओळखला जातो.

शेतकरी आंदोलनातील सहभाग

दिल्जीत दोसांझचे एक वेगळे रूप शेतकरी आंदोलनाच्या काळात पाहायला मिळाले. पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तो थेट दिल्लीच्या सीमेवर पोहोचला होता. त्याच्या शेतकऱ्यांप्रती असलेल्या प्रेमामुळे त्याने या आंदोलनात सक्रिय भूमिका घेतली, त्याने आंदोलनाच्या ठिकाणी भाषण देखील दिले आणि शेतकऱ्यांना मदत करण्याचा आश्वासन दिले. त्याचा हा निर्णय त्याच्या चाहत्यांसाठी एक प्रेरणादायक ठरला आणि त्याची समाजप्रती असलेली जबाबदारी दाखवणारा ठरला.

आंतरराष्ट्रीय ओळख आणि यश

दिल्जीतच्या करिअरला आंतरराष्ट्रीय स्तरावरही यश मिळाले आहे.त्याने अमेरिकेतील अनेक ठिकाणी त्याचे shows सादर केले आहेत आणि त्याचे आंतरराष्ट्रीय टुर त्याच्या जागतिक लोकप्रियतेचा पुरावा आहेत. दिल्जीतच्या गाण्यांचे म्युझिक व्हिडिओ यूट्यूबवर कोटींमध्ये पाहिले जातात, आणि त्याचे गाणे जगभरातील म्युझिक लवरध्ये प्रसिद्ध झाले आहेत.

दिल्जीतच्या यशाचे गमक

दिल्जीत दोसांझचे यश त्याच्या कष्टांवर आणि समर्पणावर आधारित आहे. त्याचे साधेपण, मेहनती वृत्ती, आणि सातत्याने नवीन काहीतरी करण्याची इच्छा यामुळे त्याने स्वतःला एक खास स्थान निर्माण केले आहे. तो फक्त एक सुपरस्टार नाही, तर एक प्रेरणादायक व्यक्तिमत्व आहे, जो आपली कामगिरी नेहमीच प्रामाणिकपणे पार पाडतो.
आपल्या देशातील प्रमुख स्टार पैकी असलेल्या दिल्जीतने फूल ना फुलाची पाकळी या म्हणी प्रमाणे आपल्या भारत देशाचे नाव शिखरावर पोहचवले आहे.

https://en.wikipedia.org/wiki/Diljit_Dosanjh

धन्यवाद!

http://newsmarathi.in

Spread the love

2 thoughts on “दिल्जीत दोसांझ : एक पंजाबी सुपरस्टार ते बॉलिवूडचा सुपरहिट नं.1 अभिनेता”

Leave a Comment