News Marathi

Alert! तुमच्या सोबत ही होऊ शकतात हे बँकिंग फ्रॉड्स

Alert! तुमच्या सोबत ही होऊ शकतात हे बँकिंग फ्रॉड्स

बँकिंग

भारतात Digital Banking झपाट्याने विकास होत आहे, आपण सर्रास Online Banking आणि डिजिटल पेमेंट पद्धतीचा वापर करत आहोत  यासोबतच ऑनलाईन फसवणूक तसेच सायबर गुन्हेगारीच्या घटना देखील खूपच वाढल्या आहेत. म्हणूनच, बँकिंग प्रणाली सुरक्षित ठेवण्यासाठी सायबर सुरक्षा आणि फसवणूक प्रतिबंधात्मक उपायांची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. याच संबंधित आपण  या लेखात  सायबर सुरक्षेच्या दृष्टीने बँकिंग फसवणूक टाळण्याचे उपाय, महत्त्वाचे सल्ले, आणि बँकिंग संस्था आणि सरकारने घेतलेल्या उपाययोजनांचा आढावा घेणार आहोत.

१. सायबर फसवणूक कशी होते?

Online Banking सेवांमध्ये फसवणूक करणारे विविध टेक्नॉलजीचा वापर करतात, जसे की:
फिशिंग: फसवणूक करणारे व्यक्ती खोट्या ईमेल, मेसेज किंवा वेबसाइटद्वारे आपल्याला आपल्या बँक खात्याची माहिती भरायला लावतात.
व्हिशिंग: फोन कॉलद्वारे व्यक्तीची खाजगी माहिती गोळा करणे.
मलवेअर अटॅक: हॅकर्स व्हायरसद्वारे आपल्या डिव्हाईसवरील बँकिंग माहिती चोरी करण्याचा प्रयत्न करतात.
– एसएमएस फसवणूक: फसवणूक करणारे तुम्हाला एसएमएसद्वारे खोट्या ऑफर्स देतात आणि त्यात लिंकद्वारे आपली माहिती गोळा करतात.

२. फसवणूक टाळण्यासाठी सल्ले

आपण जर  खालील गोष्टींचे पालन केले तर  Banking फसवणूक टाळू शकतो :

कधीही ओळख नसलेल्या लिंकवर क्लिक करू नका: खोट्या ईमेल किंवा मेसेजद्वारे आलेल्या लिंकवर कधीही क्लिक करू नका. नेहमी अधिकृत (authorized) वेबसाइटद्वारेच लॉगिन करा.
दुर्बळ (weak) पासवर्ड वापरू नका: पासवर्ड मजबूत आणि वेगवेगळ्या संकेतांकांचे वापर करून ठेवा.
–  Two-Factor Authentication वापरा: बँकिंग व्यवहार करताना दुहेरी प्रमाणीकरणाचा वापर करा. यामुळे तुमच्या खात्याला अधिक सुरक्षितता मिळेल.
फिशिंग आणि व्हिशिंग कॉल्सपासून सावध रहा: बँक किंवा बँक कर्मचारी  कधीही फोनवरून तुमच्या खात्याची गोपनीय माहिती विचारत नाहीत. अशा कॉल्सला प्रतिसाद देऊ नका.
बँकिंग Notification नियमित तपासा: तुमच्या बँकेच्या खात्याच्या स्टेटमेंट्स आणि एसएमएस अलर्ट्स नियमित तपासा. कोणताही संशयास्पद व्यवहार आढळून आल्यास त्वरित तुमच्या बँकेशी संपर्क साधा.

३. सायबर फसवणूक घडल्यास काय करावे?

जर तुम्हाला सायबर फसवणूक झाल्याचे लक्षात आले, किंवा संशयास्पद काही घडले तर त्वरित पुढील उपाय करा:      ताबडतोब बँकेशी संपर्क साधा: तुमच्या बँकेच्या ग्राहक सेवा क्रमांकावर त्वरित कॉल करा किंवा जवळच्या शाखेत जाऊन  भेट द्या. बँकेला तुमच्या खात्यातील संशयास्पद व्यवहारांबद्दल माहिती द्या. व्यवहाराची सर्व माहिती देऊन अधिकृत तक्रार नोंदवा.                                                                                                                                नवीन पासवर्ड सेट करा: तुमच्या बँकिंग खात्याचा पासवर्ड त्वरित बदलून नवीन आणि मजबूत पासवर्ड सेट करा.अन्य Banking Application  आणि सर्व ऑनलाइन खात्यांसाठी देखील तातडीने पासवर्ड अपडेट करा.                               – संबंधित सरकारी संस्थेला माहिती द्या: आर्थिक फसवणूक झाल्यास, आपल्या शहरातील सायबर पोलीस विभाग किंवा साइबर क्राइम सेल कडे तक्रार नोंदवा. भारत सरकारने सायबर फसवणूक तक्रारी नोंदवण्यासाठी एक हेल्पलाइन क्रमांक 1930 चालू केला आहे. यावर त्वरित कॉल करून तक्रार नोंदवू शकता.www.cybercrime.gov.in या वेबसाइटवर देखील तुमची तक्रार ऑनलाइन नोंदवु शकता.                           – आर्थिक नुकसान टाळा: तुमच्या खात्यातील पैशांचा प्रवेश थांबविण्यासाठी बँकेकडून खाते तात्पुरते गोठवून घ्या.    –  बँक स्टेटमेंट्स तपासा : तुमच्या बँक खात्याचे स्टेटमेंट तपासून सर्व व्यवहार योग्य आहेत का, हे पाहा. कोणत्याही प्रकारचा नवीन व्यवहार, डेबिट किंवा क्रेडिट घडल्यास लगेचच बँकेला कळवा.

४. बँकांनी घेतलेली सुरक्षा व उपाययोजना

Bank त्यांच्या ग्राहकांचे व्यवहार सुरक्षित ठेवण्यासाठी विविध सुरक्षा उपाययोजना करतात, जसे:
– एन्क्रिप्शन तंत्रज्ञान: सर्व व्यवहार एन्क्रिप्शनद्वारे सुरक्षित ठेवले जातात, ज्यामुळे हॅकर्सना माहिती चोरी करणे कठीण होते.
– रिअल-टाइम अलर्ट्स: ग्राहकांच्या खात्याशी संबंधित सर्व व्यवहारांवर रिअल-टाइम अलर्ट्स दिले जातात.
– बायोमेट्रिक प्रमाणीकरण: मोबाइल बँकिंगमध्ये बायोमेट्रिक प्रमाणीकरणाची सुविधा दिली जाते, ज्यामुळे फसवणुकीचा धोका कमी होतो.
– कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणाली: संशयास्पद व्यवहार ओळखण्यासाठी आणि थांबवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालींचा वापर केला जातो.

५. सायबर सुरक्षा कायदे आणि नियम

भारत सरकारने सायबर फसवणूक प्रतिबंध करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण कायदे आणि नियम बनवले आहेत:
– इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट, २०००: या कायद्यानुसार सायबर फसवणूक करणाऱ्यांना कठोर शिक्षा दिली जाऊ शकते.
– डिजिटल बँकिंग सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) Digital Banking व्यवहारांसाठी सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. https://www.rbi.org.in/
– फ्रॉड रिपोर्टिंग सिस्टम: फसवणूक झाल्यास बँकेच्या वेबसाईटवर फसवणुकीची तक्रार नोंदवता येते.

६. ग्राहकांनी घ्यावयाची काळजी 

मोबाइल अँटीव्हायरस आणि सुरक्षा ॲप्स: तुमच्या स्मार्टफोनवर अँटीव्हायरस किंवा सुरक्षा ॲप्स इन्स्टॉल करा.
वायफाय नेटवर्कची काळजी: सार्वजनिक वायफाय नेटवर्कवरून बँकिंग व्यवहार करणे टाळा.
नियमित लॉगिन तपासा: तुमच्या डिजिटल Banking Application वर  कोणत्याही वेळेस, कोणाकडून लॉगिन झाले असेल, ते तपासून ठेवा.

७. फसवणूक आणि सायबर हल्ल्यांपासून बचावासाठी काही महत्त्वाचे उपाय

बँक ग्राहकांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी खालील गोष्टी पाळायला हव्या:
– गोपनीयता राखा: आपली Banking माहिती, ओटीपी, पासवर्ड इतर कुणालाही सांगू नका.
– प्रत्येक व्यवहारावर लक्ष ठेवा: प्रत्येक व्यवहाराचे बँक स्टेटमेंट वेळोवेळी तपासून संशयास्पद व्यवहार झाल्यास लगेच बँकेशी संपर्क साधा.
– Banking Application  अपडेट ठेवा: सर्व बँकिंग ॲप्स नवीन व्हर्जनवर अपडेट ठेवा.

सुरक्षित आणि  फसवणूक-मुक्त  बँकिंगसाठी ग्राहकांनी योग्य सावधानी बाळगणे, तसेच बँकांनी योग्य सुरक्षा उपाययोजना राबवणे आवश्यक आहे. ज्यामुळे आपली आयुष्यभर कमावलेली संपत्ति सुरक्षित राहील, बँकिंग फसवणूक रोखण्यासाठी ग्राहक, बँका आणि सरकार या सर्वांचे सहकार्य महत्वाचे आहे.

यथे क्लिक करा

Scholarship : महाराष्ट्र सरकारच्या top 5 स्कॉलरशिप योजना

Spread the love
Exit mobile version