छत्रपती शिवाजी महाराज: मराठा साम्राज्याचे संस्थापक
छत्रपती शिवाजी महाराज (१९ फेब्रुवारी १६३० – ३ एप्रिल १६८०) हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. त्यांनी विजापूरच्या आदिलशाहीमधून स्वतंत्र राज्य निर्माण करून मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. इ.स. १६७४ मध्ये रायगड किल्ल्यावर त्यांचा मोठ्या थाटामाटात राज्याभिषेक झाला आणि ते छत्रपती झाले.
छत्रपति शिवाजी महाराजांनी आपल्या कारकीर्दीत मुघल, आदिलशाही, कुतुबशाही तसेच इंग्रज, पोर्तुगीज आणि डच यांसारख्या युरोपियन सत्तांशी संघर्ष केला. लष्करी शिस्त, उत्तम प्रशासन आणि गनिमी काव्याच्या तंत्राने त्यांनी आपले राज्य विस्तारले. त्यांनी जुन्या किल्ल्यांचे पुनरुत्थान केले आणि अनेक नवीन किल्ले बांधले. प्रशासनात मराठी आणि संस्कृत भाषांना प्राधान्य देऊन त्यांनी स्वराज्याला मजबूत पाया दिला.
त्यांची युद्धनीती अत्यंत चतुर होती. मुघल आणि आदिलशाहीच्या बलाढ्य सैन्यांशी त्यांनी कुशलतेने सामना केला. थोड्याच सैन्याच्या बळावर त्यांनी मोठमोठ्या सैन्यांना हरवले. लोकशाहीसदृश राज्यपद्धती निर्माण करून त्यांनी एक प्रगत आणि सुसंघटित राज्य उभारले.
छत्रपति शिवाजी महाराजांचा प्रभाव पुढील काळात अधिक वाढला. विशेषतः भारतीय स्वातंत्र्यलढ्यात, त्यांना आदर्श मानून अनेक क्रांतिकारकांनी प्रेरणा घेतली. आजही त्यांचा जन्मदिवस “शिवजयंती” म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
छत्रपति शिवाजी महाराजांचे बालपण आणि प्रारंभिक जीवन
छत्रपति शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांचे वडील शहाजीराजे भोसले हे विजापूरच्या आदिलशाही दरबारात उच्च पदावर होते, तर आई जिजाबाई या धार्मिक आणि कर्तृत्ववान स्त्री होत्या.
शिवरायांचे नाव शिवाई देवीच्या नावावरून ठेवले गेले. असे म्हणतात की, जिजाबाईंनी या देवीच्या चरणी प्रार्थना करून पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद मागितला होता. लहानपणापासूनच जिजाबाईंनी शिवरायांना हिंदवी स्वराज्य स्थापनेची प्रेरणा दिली.
त्या काळात महाराष्ट्रात विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि मुघल साम्राज्य यांची सत्ता होती. शहाजीराजे हे कुशल सेनानी होते आणि त्यांनी अनेकदा वेगवेगळ्या सत्ताधीशांसोबत संधीप्रमाणे हातमिळवणी केली. परंतु, त्यांनी पुणे ही जहागिरी कायम ठेवली आणि स्वतःच्या सैन्याची ताकद वाढवत नेली.
छत्रपति शिवाजी महाराजांचे बालपण पुण्यात गेले. त्यांच्यावर दादोजी कोंडदेव यांचे शिक्षण आणि प्रशिक्षण झाले. त्यांनी युद्धकौशल्य, प्रशासन आणि किल्ले बांधणी यामध्ये लहान वयातच प्राविण्य मिळवले. वयाच्या तेराव्या वर्षीच त्यांनी राज्यकारभारात रस घ्यायला सुरुवात केली.
जिजाबाईंनी त्यांच्यावर रामायण, महाभारत आणि महान हिंदू राजे यांची शिकवण दिली. त्यांच्या विचारांतूनच पुढे “हिंदवी स्वराज्य” या संकल्पनेचा जन्म झाला.
स्वराज्य स्थापनेची सुरुवात
१६४५ मध्ये, अवघ्या १५व्या वर्षी, शिवाजी महाराजांनी आदिलशाहीच्या ताब्यातील तोरणा किल्ला जिंकला. आणि तेथे सापडलेला मोठा खजिना ताब्यात घेतला ही त्यांची पहिली मोठी मोहीम होती. पुढील काही वर्षांत त्यांनी पुरंदर, कोंढाणा, चाकन, आणि इंदापुर असे एकापाठोपाठ एक किल्ले जिंकून आपली सत्ता प्रस्थापित केली. अणि त्यानंतर ते कोकणाकडे वळले अणि कल्याण हे महत्वाचे शहर विजापुर सरकारच्या ताब्यातून हिसकावून घेतले।
छत्रपति शिवाजी महाराजांच्या या करवाई मुळ त्यांनी थेट विजापूरच्या सुलतानाला आव्हान दिले. यामुळे विजापुर सरकारच्या आदेशा प्रमाणे एक मराठा सरदारने शहाजी राजांना कैद केले. त्यामुळे शिवरायांनी आपल्या मोहिमेला विराम दिला अणि शाहजी राजांच्या सुटकेनंतर त्यांनी पुन्हा छापेमारीला सुरुवात केलि अणि त्यातच त्यांनी १६५६ मध्ये जावळीच्या खोऱ्याचा विजापूरचा सरंजामदार चंद्रराव मोरे याला ठार मारला. अणि जावळीचा सर्व प्रदेश आपल्या ताब्यात घेतला.
अफजल खानाचा वध
छत्रपति शिवाजी महाराजांनी केलेल्या नुक़्सानीमुळे विजापुर च्या सल्तानीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले त्यावेळी नुक्तच गादीवर बसलेला आदिल शाह दूसरा याच्या वर विजापुरची जबाबदारी होती परन्तु सर्व त्याची आई बघायचि. त्याच्या आईने एका बलाढ्य सैनिकाची निवड केलि त्याचे नाव अफजल खान आसे होते.
अफजल खानाने त्याच्या वाटेत येईल ते मंदिरे तोडायला सुरुवात केलि व त्यांची विटंबना करू लागला. त्यामध्ये तुळजापुरचे तुळजाभवानी मंदिर असेल पंढरपूरचे विट्ठल मंदिर असेल अश्या हिन्दू तो विटंबना करू लागला. विजापुरी सैन्याच्या पाठलगानंतर महाराज प्रताप गढावर पोहचले. छत्रपति शिवजी महाराजांनी अफजल खानाला प्रताप गडाच्या पायथ्याशी बोलवून घेतले. १० नोव्हेम्बर १६५९ रोजी दोघांची भेट झाली अणि दोघांनी एक सहकारी व एकच तलवार घेवून यावे ऐसे ठरले. अफजल खान दगा करेल अशी कल्पना महाराजांना आधीपासूनच होती त्यामुळे त्यांनी सावधगिरि म्हणून आपल्या अंगावर चिलखत चढवले अणि सोबत बिछवा, खंजीर अणि वाघनखे ऐसे शस्त्र घेतले. छत्रपति शिवजी महाराजांसोबत जीवा महला नावाचे विश्वासु अंगरक्षक होते तर अफजल खानसोबत सय्यद बंडा नावाचा अंगरक्षक होता. भेटि दरम्यान अफजल खानाने महराजांना मिठी मरली अणि दगा केला तो शिवाजी महाराजांना मानेला धारण दाबू लागला अणि त्याने कट्यारिने वार करायला सुरुवात केलि महाराजांच्या शरीरावर चिलखत असल्यामुळे कट्यार चालली नाही. अफजल खान दगा करणार हे महाराजांना आधीपासूनच माहिती होते. महाराजांनी सोबत असलेले वाघनखे खानाच्या पोटात घुसवली खान ओरडला त्याच क्षणी सय्यद बंडाने शिवाजी महाराजांवर वर केला तो वर जीवा महाला यांनी आपल्या अंगावर घेतला म्हणूनच म्हणतात ना “होता जीवा म्हणून वाचला शिवा”
राज्याभिषेक आणि स्वराज्याची मजबुती
छत्रपति शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याला अधिकृत मान्यता मिळावी म्हणून १६७४ मध्ये रायगडावर मोठ्या थाटामाटात राज्याभिषेक सोहळा केला. ते हिंदवी स्वराज्याचे छत्रपती झाले. त्यांनी प्रशासकीय व्यवस्था सुधारली, न्यायव्यवस्था प्रस्थापित केली आणि अर्थव्यवस्थेला चालना दिली.
त्यांनी आपल्या नौदलाची उभारणी केली आणि पश्चिम किनारपट्टीवर अनेक सागरी किल्ले बांधले. मराठा आरमार हे त्या काळातील बलाढ्य सागरी सैन्यांपैकी एक बनले.
वारसा
१६८० मध्ये रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतरही मराठ्यांनी त्यांच्या तत्वांवर आधारित राज्यकारभार चालू ठेवला. पुढे पेशव्यांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्याने दिल्लीपर्यंत सत्ता प्रस्थापित केली.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात शिवाजी महाराजांचे विचार प्रेरणादायी ठरले. त्यांचे धैर्य, स्वराज्याची संकल्पना आणि स्वाभिमान आजही लोकांसाठी प्रेरणादायक आहेत.
छत्रपति शिवाजी महाराज हे केवळ एक योद्धा नव्हते, तर एक दूरदर्शी प्रशासक, लोकनेता आणि स्वातंत्र्याचा उद्घोष करणारे महानायक होते. त्यांच्या जीवनातून आपण धैर्य, शिस्त, स्वाभिमान आणि लोककल्याणाचा धडा शिकू शकतो. मराठी अस्मितेचे प्रतीक असलेल्या शिवाजी महाराजांचे नाव आजही गौरवाने घेतले जाते.
2 thoughts on “chhatrapati shivaji maharaj छत्रपती शिवाजी महाराज: मराठा साम्राज्याचे संस्थापक”