---Advertisement---

महाराष्ट्रातील Top कृषि विद्यापीठे व अंतर्गत महाविद्यालये

By
Last updated:
Follow Us

महाराष्ट्रातील Top कृषि विद्यापीठे व अंतर्गत महाविद्यालये

विद्यापीठ

कृषि औद्योगीकरण व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी हरित क्रांतीचे जनक व शेतीविषयी नितांत प्रेम असणारे शेतकरी पुत्र व तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी देशात पहिल्यांदाच चार कृषि विद्यापीठांची स्थापना केली कोकण, पश्चिम महाराष्ट्रा, मराठवाडा, विदर्भ या चारही विभागांमध्ये शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी व सक्षमीकरणसाठी वसंतराव नाईक यांच्या दूरदृष्टीतुन या विद्यापीठांची उभारणी करणीयत आली. या चारही कृषि विद्यापीठांचा फायदा हा महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यांना होत आहे.

महाराष्ट्रात कृषी, उद्यानविद्या, वनीकरण, मत्स्यपालन, कृषी अभियांत्रिकी, कापणी नंतरचे व्यवस्थापन, अन्न तंत्रज्ञान, कृषी जैव तंत्रज्ञान तसेच पशुवैद्यकीय, दुग्ध तंत्रज्ञान, मत्स्यविज्ञान, कृषी-व्यवस्थापन व विविध कृषिक्षेत्रातील अभ्यासक्रमांसाठी, पदवी-पदव्युत्तर (बी.एस.सी., बी.टेक., एम.एस.सी., एम.टेक., एम.बी.ए.) शिक्षण देणारी अशी शासकीय महाविद्यालये आहेत. हे अभ्यासक्रम महाराष्ट्रातल्या ४ विविध कृषी विद्यापीठ व १ पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ यांच्याशी संलग्नित आहेत. कृषी क्षेत्रातील शासकीय महाविद्यालये ही जास्त करून विद्यापीठ जिथे आहे त्याच ठिकाणी आहेत. महाराष्ट्रात असलेल्या ४ कृषी विद्यापीठ व १ पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ यांच्याअंतर्गत येणारी कृषी क्षेत्रातील महाविद्यालये प्रत्येक विद्यापीठानुसार खालीलप्रमाणे :

 

1. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि-अहमदनगर :

विद्यापीठ

महात्मा फुले कृषि विद्यापीठ हे फक्त  महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील अग्रगण्य कृषि विद्यापीठांमध्ये राहुरी येथील  कृषि विद्यापीठाचा समावेश होतो. हे विद्यापीठ १९६८ साली स्थापन करण्यात आले असून, राज्यातील पश्चिम महाराष्ट्र भागासाठी हे प्रमुख आहे.

महत्त्वाची वैशिष्ट्ये:

  • आधुनिक कृषि संशोधनासाठी प्रसिद्ध.
  • शेतीतील आधुनिक पद्धती, सेंद्रिय शेती, व जलसंधारणाच्या तंत्रज्ञानावर संशोधन.
  • विद्यापीठाकडे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त प्रयोगशाळा आहेत.
  • मुख्य अभ्यासक्रम: डिप्लोमा इन ॲग्रिकल्चरल टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन ॲग्रिकल्चरल पॉलिटेक्निक, बी.एस्सी. (ऑनर्स) एबीएम, बी.टेक. (कृषी अभियांत्रिकी), बी.एस्सी. (ऑनर्स) फलोत्पादन, बी.एस्सी. (ऑनर्स) कृषी, बी.टेक. (फूड टेक्नॉलॉजी), बी.एस्सी. (ऑनर्स) पशुसंवर्धन, बी.टेक. (जैवतंत्रज्ञान), कृषी विज्ञानातील पदव्युत्तर आणि डॉक्टरेट अभ्यासक्रम

महात्मा फुले कृषी विद्यापीठा अंतर्गत  येणारी कृषी क्षेत्रातील महाविद्यालये  खालीलप्रमाणे :

१. कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर, पुणे.

२. कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर, धुळे.

३. राजर्षी छत्रपती शाहू महाराज कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर, कोल्हापूर.

४. कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर, नंदुरबार.

५. कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर, कराड, जि-सातारा.

६. कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर, मुक्ताईनगर, जि-जळगाव.

७. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर, हलगाव, ता-जामखेड, जि-अहमदनगर.

८. कॉलेज ऑफ होर्टीकल्चर, पुणे.

९. डॉ. अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, राहुरी, जि-अहमदनगर.

१०. पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट, राहुरी, जि-अहमदनगर.

2. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला :

विद्यापीठ

विदर्भाच्या हृदयस्थानी असलेले हे विद्यापीठ १९६९ साली स्थापन झाले. विदर्भातील कृषी समस्यांवर उपाय शोधण्यासाठी आणि तेथील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी हे विद्यापीठ सतत कार्यरत आहे. विद्यापीठाला शेतकरी पुत्र व जाणते नेते डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव देण्यात आले आहे.

महत्त्वाची वैशिष्ट्ये:

  • विदर्भातील पर्जन्याधारित शेती, कापूस उत्पादन, व भाजीपाला लागवडीत महत्त्वपूर्ण योगदान.
  • जलव्यवस्थापन व कोरडवाहू शेतीसाठी विशेष अभ्यासक्रम.
  • संशोधनासाठी अत्याधुनिक प्रयोगशाळा व सुविधा.
  • मुख्य अभ्यासक्रम: बी.एस्सी. (ऑनर्स) (कृषी), B.Sc. (ऑनर्स) (हॉर्टिकल्चर), B.Sc. (ऑनर्स) (वनशास्त्र), बी.टेक. (कृषी अभियांत्रिकी), बी.टेक. (फूड टेक्नॉलॉजी), बी.टेक. (जैवतंत्रज्ञान), बी.एस्सी. (ऑनर्स) (कृषी. व्यवसाय व्यवस्थापन), M.Sc.(कृषी), M.Tech.(Agril.Engg.), M.Sc.(हॉर्टिकल्चर), M.Sc.(वनशास्त्र), M.Sc. (Agril. Biotechnology), MBM (Agri. Business Management), PhD

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठा अंतर्गत  येणारी कृषी क्षेत्रातील महाविद्यालये  खालीलप्रमाणे :

१. कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर, नागपूर.

२. कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर, अकोला.

३. कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर, सोनापूर, जि-गडचिरोली.

४. कॉलेज ऑफ होर्टीकल्चर, अकोला.

५. कॉलेज ऑफ फॉरेस्ट्री, अकोला.

६. कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, अकोला.

७. पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट, अकोला.

८. स्कुल ऑफ ऍग्री-बिझनेस मॅनेजमेंट, नागपूर.

९. कॉलेज ऑफ फुड टेक्नॉलॉजी, यवतमाळ.

१०. वसंतराव नाईक कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर बायो-टेक्नॉलॉजी, यवतमाळ.

११. श्री शिवाजी कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर, अमरावती.

१२. आनंद निकेतन कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर, वरोरा, जि-चंद्रपूर.

3. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी :

विद्यापीठ

मराठवाडा भागातील कृषि संशोधनासाठी अग्रगण्य असलेल्या या विद्यापीठाची स्थापना १९७२ साली झाली. हे विद्यापीठ मराठवाड्यातील आठही जिल्हयांच्या  शेतकऱ्यांसाठी आधारवड ठरले आहे. 2012 मध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठवाडा कृषि विद्यापीठ हे नाव बदलून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ असे करण्यात आले.
महत्त्वाची वैशिष्ट्ये:

  • हरितक्रांती आणि पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनासाठी संशोधन.
  • डाळी, तेलबिया, आणि उष्णकटिबंधीय फळांवर विशेष अभ्यासक्रम.
  • मराठवाड्यातील हवामान व मृदाशास्त्रावर आधारित संशोधन प्रकल्प.
  • मुख्य अभ्यासक्रम: बी.एस्सी. (ऑनर्स) (कृषी), B.Sc. (ऑनर्स) (हॉर्टिकल्चर), B.Sc. (ऑनर्स) (वनशास्त्र), बी.टेक. (कृषी अभियांत्रिकी), बी.टेक. (फूड टेक्नॉलॉजी), बी.टेक. (जैवतंत्रज्ञान), बी.एस्सी. (ऑनर्स) (कृषी. व्यवसाय व्यवस्थापन), M.Sc.(कृषी), M.Tech.(Agril.Engg.), M.Sc.(हॉर्टिकल्चर), M.Sc.(वनशास्त्र), M.Sc. (Agril. Biotechnology), MBM (Agri. Business Management), PhD

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठा अंतर्गत  येणारी कृषी क्षेत्रातील महाविद्यालये  खालीलप्रमाणे :

१. कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर, परभणी.

२. कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर, लातूर.

३. कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर, बदनापूर, जि-जालना.

४. कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर, अंबेजोगाई, जि-बीड.

५. कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर, उस्मानाबाद.

६. कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर, गोळेगाव, ता-औंढा, जि-हिंगोली.

७. कॉलेज ऑफ होर्टीकल्चर, परभणी.

८. कॉलेज ऑफ फुड टेक्नॉलॉजी, परभणी.

९. कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, परभणी.

१०. विलासराव देशमुख कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर बायो-टेक्नॉलॉजी, लातूर.

११. कॉलेज ऑफ कम्युनिटी सायन्स, परभणी.

१२. पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ ऍग्रीकल्चर बिझनेस मॅनेजमेंट , चाकूर, जि- लातूर.

4. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि-रत्नागिरी :

विद्यापीठ

कोकण विभागातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे असलेले हे विद्यापीठ १९७२ साली स्थापन झाले. हरित क्रांतीचे जनक व तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्रात चार कृषि विद्यापीठे स्थापन केली त्यातीलच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ हे एक मुख्य विद्यापीठ. विद्यापीठाचे पूर्वीचे नाव हे कोकण कृषि विद्यापीठ असे होते त्यानंतर पी. के. सावंत व पुढे चालून डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ असे करन्यात आले.

महत्त्वाची वैशिष्ट्ये:

  • कोकणातील फळबाग शेती (आंबा, काजू, नारळ) यावर संशोधन.
  • मत्स्य उत्पादन, जलशेती, आणि भात लागवडीवर विशेष काम.
  • जैविक शेती व जैवविविधता जतन करण्यासाठी विशेष प्रकल्प.
  • मुख्य अभ्यासक्रम: बी.एस्सी. (ऑनर्स) (कृषी), B.Sc. (ऑनर्स) (हॉर्टिकल्चर), B.Sc. (ऑनर्स) (वनशास्त्र), बी.टेक. (कृषी अभियांत्रिकी), बी.टेक. (फूड टेक्नॉलॉजी), बी.टेक. (जैवतंत्रज्ञान), बी.एस्सी. (ऑनर्स) (कृषी. व्यवसाय व्यवस्थापन), M.Sc.(कृषी), M.Tech.(Agril.Engg.), M.Sc.(हॉर्टिकल्चर), M.Sc.(वनशास्त्र), M.Sc. (Agril. Biotechnology), MBM (Agri. Business Management), PhD

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठा अंतर्गत  येणारी कृषी क्षेत्रातील महाविद्यालये  खालीलप्रमाणे :

१. कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर, दापोली, जि-रत्नागिरी.

२. कॉलेज ऑफ फिशरी, शिरगाव, जि-रत्नागिरी.

३. कॉलेज ऑफ फॉरेस्ट्री, दापोली, जि-रत्नागिरी.

४. कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, दापोली, जि-रत्नागिरी.

५. कॉलेज ऑफ होर्टीकल्चर, मूळदे, ता-कुडाळ, जि-सिंधुदुर्ग.

६. पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट, किल्ला-रोहा, रायगड.

5. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर :

वेटरनरी (पशुवैद्यकीय) महाविद्यालय :
१. मुंबई वेटरनरी कॉलेज, मुंबई.

२. नागपूर वेटरनरी कॉलेज, नागपूर.

३. कॉलेज ऑफ वेटरनरी अँड एनिमल सायन्स, परभणी.

४. कॉलेज ऑफ वेटरनरी अँड एनिमल सायन्स, उदगीर, जि-लातूर.

५. क्रांतिसिंह नाना पाटील कॉलेज ऑफ वेटरनरी सायन्स, शिरवळ, जि-सातारा.

६. पोस्टग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ वेटरनरी अँड एनिमल सायन्स, अकोला.

फिशरी आणि डेयरी  विषयक अभ्यासक्रम देणारे काही महविद्यालये खालील प्रमाणे 

फिशरी सायन्स (मत्स्यविज्ञान) :

१. कॉलेज ऑफ फिशरी सायन्स, नागपूर.

२. कॉलेज ऑफ फिशरी सायन्स, उदगीर, जि-लातूर.

डेयरी टेक्नॉलजी  (दुग्ध तंत्रज्ञान) :

१. कॉलेज ऑफ डेयरी टेक्नॉलॉजी, वरुड, पुसद, जि-यवतमाळ.

२. कॉलेज ऑफ डेयरी टेक्नॉलॉजी, उदगीर, जि-लातूर.

या सगळ्या महाविद्यालयात असलेले अभ्यासक्रम, प्रवेश क्षमता व अधिक माहिती तसेच इतर सगळ्या खाजगी महाविद्यालयाबद्दलची माहिती त्या त्या विद्यापीठाच्या ऑफशियल वेबसाईट वर उपलब्ध आहे.

नागपूर (१९०६) व पुणे येथील कृषी महाविद्यालय हे भारतात सगळ्यात पहिले चालू होणाऱ्या ५ कृषी महाविद्यालयांपैकी दोन आहेत.
मुंबई वेटरनरी कॉलेज हे भारतातील सगळ्यात पहिले पशुवैद्यकीय महाविद्यालय आहे ज्याची स्थापना १८८६ मध्ये झाली.

Spread the love
For Feedback - feedback@example.com
Join Our WhatsApp Channel

Related News

1 thought on “महाराष्ट्रातील Top कृषि विद्यापीठे व अंतर्गत महाविद्यालये”

Leave a Comment